Friday, May 17, 2024
Homeराजकारणराज - उद्धव एकत्र येण्याच्या चर्चां असतानाच, राज ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री...

राज – उद्धव एकत्र येण्याच्या चर्चां असतानाच, राज ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

मुंबई : राज्यातील राजकीय घडामोडी सातत्याने बदलत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याबाबतचे बॅनर्स कार्यकर्त्यांकडून मुंबई, ठाण्यात लावण्यात आले होते. त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांना उधान आले असताना राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

गेल्या काही दिवसांत राज्यातील राजकारणात खळबळ उडवणाऱ्या गोष्टी घडल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आहे. शुक्रवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. ही भेट नेमकी कोणत्या कारणासाठी होत आहे हे अद्याप समोर आलेलं नाही. मात्र या भेटीचे अनेक राजकीय अर्थ देखील काढले जात आहेत.

दरम्यान, या भेटीत राज्यातील काही प्रश्नांवर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. राज्यात अद्याप चांगल्या पावसाला सुरूवात झालेली नाही. पेरण्यांचे प्रमाणही कमी आहे, अशा परिस्थितीत नाशिक जिल्हा सहकारी बँक जिल्ह्यातील अल्प कर्जदार शेतकऱ्यांच्या मागे वसुलीसाठी तगादा लावत असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. या झालेल्या भेटीत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसमवेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांसोबतच वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास आदी विषयांवर चर्चा केली. त्यावेळी मनसेचे नेते बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे उपस्थित होते.

हे ही वाचा :

‘हा आपल्या दोघांतील मुलभूत फरक’ खा. कोल्हेंचे आढळराव पाटील यांना प्रत्यूत्तर

ब्रेकिंग : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ठाकरे गटाच्या बड्या महिला नेत्या शिंदे गटात

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकांच्या निवडणुकीचा बिगूल वाजणार?

ऑनलाईन गेम खेळताना प्रेम जडलं, 4 मुलांची आई प्रियकरासाठी थेट पाकिस्तानातून भारतात

ब्रेकिंग : 9 आमदार आणि 3 खासदार निलंबित; महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोडी

मोठी बातमी : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार, मनसेकडून प्रस्ताव ?

आदिवासी मजुरावर लघुशंका : भाजप नेत्यास अटक ; घरावर बुलडोझर

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय