Friday, April 26, 2024
Homeआंतरराष्ट्रीयव्हॅाट्सअप, फेसबुकसह इन्स्टाग्रामची सेवा सात तास होती ठप्प, कंपनीने मागितली माफी !

व्हॅाट्सअप, फेसबुकसह इन्स्टाग्रामची सेवा सात तास होती ठप्प, कंपनीने मागितली माफी !

नवी दिल्ली : व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुकचे सर्व्हर डाऊन झाल्याने या कंपन्यांची सेवा काही काळासाठी ठप्प झाली होती, त्यामुळे वापरकर्ते नाराज झाले आहे. केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुक बंद पडल्यामुळे वापरकर्त्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागले.

सोमवारी रात्री ९ च्या दरम्यान व्हाट्सएप, फेसबुक आणि इन्स्टाग्रामची सेवा ठप्प झाली होती. त्यामुळे व्हाट्सएप, फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या वापरकर्त्यांनी ट्विटरवर उडी घेतली. त्यानंतर सर्व्हर डाऊन वरून मिम्सला उधाण आले होते. ही सेवा मंगळवारी पहाटे ४ च्या नंतर पूर्ववत होण्यास सुरुवात झाली.

या तीनही प्लॅटफॉर्म डाऊनची समस्या अँड्रॉइड, आयओएस आणि कॉम्प्युटरवर दिसून आली, त्यामुळे वापरकर्ते नाराज झाले होते. त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. फेसबुक आणि इन्स्टाग्राम वापरकर्ते न्यूज फीड अपडेट करू शकले नाहीत, तर व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना संदेशाची देवाणघेवाण करता आली नाही. या अगोदरही अनेकदा या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे सर्व्हर डाऊन झालेले आहे.

दरम्यान, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुकने ट्विटरवरून दिलगिरी व्यक्त करत लवकरच ही समस्या सोडवली जाईल असे म्हटले होते. तर फेसबुकचे सिटीओ माईक स्क्रोफर यांनी ट्विट करून या गैरसोयी बाबत माफी मागितली.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय