Wednesday, August 17, 2022
Homeग्रामीणपुणे : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, निघोजे येथे विद्यार्थ्यांचे उस्फूर्त स्वागत !

पुणे : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, निघोजे येथे विद्यार्थ्यांचे उस्फूर्त स्वागत !

spot_imgspot_imgspot_imgspot_img

पुणे : पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निघोजे, तालुका खेड, जिल्हा पुणे येथे शिक्षणोत्सव कार्यक्रमांतर्गत शिक्षक विद्यार्थ्यांचे उस्फूर्त स्वागत करण्यात आले. सोमवार दि. ४ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी १०:०० वाजता कोरोना काळामुळे दीड वर्षा पेक्षा अधिक कालावधीनंतर पाचवी ते सातवीचे वर्ग  सुरू करण्यात आले. प्रदीर्घ कालावधीनंतर शाळा सुरु झाल्या.

निघोजे तालुका खेड जिल्हा पुणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ग्रामस्थांनी विद्यार्थी व शिक्षकांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. सरस्वतीचे पूजन व शिवप्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

गुलाब पुष्पाची उधळण करत विद्यार्थी, शिक्षकांचे औक्षण ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती, नाथ महाराज युवा प्रतिष्ठान चे कार्यकर्ते यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी माजी जि.प. सदस्य शीला शिंदे, माजी उपसरपंच हिरामण येळवंडे,  ग्रा. सदस्य चंद्रकांत बेंडाले, सागर येळवंडे, महिंद्रा कंपनीचे युनियन लीडर प्रशांत पाडेकर, सोसायटी माजी चेअरमन कैलास येळवंडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तानाजी येळवंडे, माजी अध्यक्ष बाळासाहेब येळवंडे, राजेंद्र पानसरे, तसेच सोमनाथ येळवंडे, जालिंदर नाणेकर हे शाळाव्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते.

यावेळी मुख्याध्यापक सुनील कातोरे, रोहिदास येळवंडे, कृष्णदेव काटकर, सुनिता निक्रड, डॉ‌ रोहिणी गव्हाणे, राजश्री दांगट, सुनीता शिंदे, रूपाली सोनटक्के, कांता यनंभर, ज्योती ढोबळे, पौर्णिमा कुसाळकर प्रतिभा गंगापुरे, रोहीणी कुऱ्हे हे शिक्षकवृंद उपस्थित होते.


व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय