Wednesday, August 17, 2022
Homeजिल्हापुणे : एस. एम. जोशी कॉलेजमध्ये भौतिकशास्त्र व इलेक्ट्रॉनिक विषयाचे आंतरराष्ट्रीय वेबिनारचे...

पुणे : एस. एम. जोशी कॉलेजमध्ये भौतिकशास्त्र व इलेक्ट्रॉनिक विषयाचे आंतरराष्ट्रीय वेबिनारचे आयोजन

spot_imgspot_imgspot_imgspot_img

हडपसर / डॉ. अतुल चौरे : रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेजमध्ये भौतिकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक व आय. क्यू. ए. सी. विभागाच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय वेबिनारचे आयोजन मंगळवार दिनांक 5 ऑक्टोबर रोजी केले आहे.

या वेबिनारच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कोरियाचे प्रोफेसर यंग पाक ली हे उपस्थित राहणार आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रोफेसर डॉ. अरविंद शालिग्राम हे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. तसेच अधिष्ठाता (सुरत) डॉ. निशाद देशपांडे व संभाजी शिंदे डॉ. नागेश मैले, लंडनचे डॉ. सचिन सेंदिया हे विविध विषयांवर शोधनिबंध सादर करणार आहेत.

समारोप समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रोफेसर डॉ. प्रमोद पाटील विचार व्यक्त करणार आहेत. अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रोफेसर डॉ. संजय ढोले  उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती एस. एम. जोशी कॉलेजचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी दिली. 

नियोजन उपप्राचार्य प्रा. संजय जडे, आय.क्यू.ए. सी. विभागाचे चेअरमन डॉ. किशोर काकडे,भौतिकशास्त्र विभागप्रमुख व समन्वयक प्रा. मोहनसिंग पाडवी, सहसमन्वयक डॉ. रत्नमाला वाघमोडे, प्रा. महेश बागल प्रा. दिनेश लोहार, प्रा. हेमंत देव करणार आहेत.


व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय