Sunday, May 19, 2024
Homeआंबेगावपेसा क्षेत्रातील शिक्षक भरती त्वरित करा; किसान सभेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना...

पेसा क्षेत्रातील शिक्षक भरती त्वरित करा; किसान सभेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र

पुणे : पेसा क्षेत्रातील शिक्षक भरती त्वरित करा, अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेच्या पुणे जिल्हा समितीच्या वतीने पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. Urgent recruitment of teachers in the PESA sector; Letter to Kisan Sabha Chief Executive Officer

पुणे जिल्ह्यात आणि एकूणच महाराष्ट्र भरामध्ये जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त आहेत. पुणे जिल्ह्यातील आदिवासी भागातील अनेक शाळा या शून्य शिक्षकी शाळा झालेल्या आहेत. शिक्षक पदासाठी आवश्यक असलेली शिक्षक अभियोग्यता परीक्षा हि परीक्षा पास झालेले अनेक अनुसूचित जमातीचे उमेदवार पात्र असूनही, अद्यापही पुणे जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील शिक्षक भरती झालेली नाही. 

अनुसूचित जमाती, पेसा क्षेत्रातील शिक्षक भरती शासनाच्या परिपत्रकानुसार पेसा क्षेत्रातील पदभरती करण्यात येणे अपेक्षित होते परंतु ही भरती अद्याप झाली नाही.

शिक्षक अभियोग्यता परीक्षा दिलेल्या उमेदवारांमधून, गुणवत्तेनुसार शैक्षणिक व व्यावसायिक अहर्ता प्राप्त उमदेवारांची, पुणे जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील शासनाने परवानगी दिलेल्या रिक्त पदांच्या मर्यादेत नियुक्तीची कार्यवाही त्वरित सुरू करावी अशी मागणी किसान सभा, पुणे जिल्हा समितीने निवेदनाद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांच्याकडे केली आहे.

सदर पेसा भरती ही २०२३ च्या रोस्टर नुसार करून आदिवासी पात्र अभियोग्यता धारक शिक्षक यांना नियुक्त करून रिक्त जागा त्वरित भराव्यात अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष डॉ.अमोल वाघमारे, जिल्हा सचिव विश्वनाथ निगळे, जिल्हा सहसचिव अशोक पेकारी, जिल्हा उपाध्यक्ष राजू घोडे, अमोद गरुड यांनी ही मागणी केली आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय