Sunday, April 28, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडUPSC निकाल जाहीर! इशिता किशोर देशात तर ठाण्याची कश्मीरा संखे राज्यात पहिली.

UPSC निकाल जाहीर! इशिता किशोर देशात तर ठाण्याची कश्मीरा संखे राज्यात पहिली.

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीचा 2022 मधील परीक्षेचा (UPSC exam result 2022) निकाल जाहीर असून यात इशिता किशोर देशात पहिली आली आहे. पहिल्या नंबर प्रमाणेच दुसऱ्या, तिसऱ्या नंबरवरही मुलींनीच बाजी मारली आहे. गरिमा लोहिया द्वितीय, उमा हरिती तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत.

दरम्यान, चौथ्या नंबरवरही मुलीनेच बाजी मारली असून स्मृति मिश्रा चौथ्या क्रमांकावर उत्तीर्ण झाली आहे. त्यामुळे सालाबादप्रमाणे यंदाही केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या निकालात मुलींचाच दबदबा दिसून येत आहे. आयएएस परीक्षेत बसलेले उमेदवार यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइट www.upsc.gov.in वर अंतिम निकाल पाहू शकतात.

यंदा 2 हजार 529 उमेदवारांनी मुलाखत दिली होती. त्यानंतर आता 15 दिवसांनी उमेदवारांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या 2022 अंतर्गत, UPSC ने IAS, IPS सह सेवांमधील 1011 पदांची जाहिरात काढली होती.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय