Thursday, November 21, 2024
Homeताज्या बातम्याशेतात कामाला गेलेल्या कुटुंबातील तिघांचा विजेच्या झटक्याने मृत्यू

शेतात कामाला गेलेल्या कुटुंबातील तिघांचा विजेच्या झटक्याने मृत्यू

Electricity : वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातील पांगरी महादेव गावात एक हृदयद्रावक दुर्घटना घडली आहे. शेतात कामाला गेलेल्या दोन भावांनंतर त्यांना शोधण्यासाठी आलेल्या वडिलांचाही विजेच्या शॉकमुळे मृत्यू झाला आहे. महावितरणच्या निष्काळजीपणामुळे हा दुर्दैवी प्रकार घडल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये शेतकरी अशोक पवार, त्यांचा मुलगा मारोती पवार आणि भावाचा मुलगा दत्ता पवार यांचा समावेश आहे. सध्या राज्यात सर्वत्र पावसाची स्थिती असून, पेरणीसह शेतात कामे जोरात सुरु आहेत. शेतात कामानिमित्त गेलेल्या मारोती आणि दत्ताला विजेच्या तारांना स्पर्श झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. मुले बराच वेळ घरी परतली नसल्यामुळे चिंतेत असलेल्या अशोक पवार यांनी त्यांना शोधण्यासाठी शेताकडे धाव घेतली. तिथे पोहोचल्यावर, दुर्दैवाने अशोक पवार देखील विजेच्या तारांच्या संपर्कात आले आणि त्यांचाही मृत्यू झाला. (Electricity)

घटनेची माहिती मिळाल्यानंतर गावात शोककळा पसरली. गावकऱ्यांनी महावितरणच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याचे सांगितले आहे. विजेच्या तारा खाली पडलेल्या असून त्यावर महावितरणने कोणतेही उपाययोजना न केल्यामुळे हा दुर्दैवी प्रकार घडल्याचा आरोप केला जात आहे. या दुर्दैवी घटनेनंतर गावात संतापाची लाट उसळली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि घटनेची नोंद केली आहे. महावितरण विभागालाही या दुर्घटनेबाबत माहिती देण्यात आली आहे. महावितरणने या गंभीर दुर्घटनेची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. महावितरण विभागाने लवकरात लवकर योग्य ती उपाययोजना करून अशा घटना पुन्हा घडू नयेत याची काळजी घेणे गरजेचे आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

धक्कादायक : अंगणवाडीत शाळेत पोषण आहारात आढळले बेडक

निवासी आदिवासी आश्रमशाळांची वेळेबाबत आदिवासी विकास मंत्री काय म्हणाले पहा !

दूध अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार

धक्कादायक : बागेतील आंबे खाल्ल्याने अल्पवयीन मुलांना झाडाला बांधून मारहाण

पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेतून विद्यार्थ्यांना मिळणार रुपये 60,000 पर्यंत लाभ

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणार 60,000 रूपये

धक्कादायक : 800 हून अधिक विद्यार्थी HIV पॉझिटिव्ह, 47 मुलांचा मृत्यू !

भाईंदर रेल्वे स्थानकावर पिता-पुत्राची आत्महत्या, हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओ व्हायरल

संबंधित लेख

लोकप्रिय