Tuesday, September 17, 2024
Homeताज्या बातम्याBhayandar : भाईंदर रेल्वे स्थानकावर पिता-पुत्राची आत्महत्या, हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Bhayandar : भाईंदर रेल्वे स्थानकावर पिता-पुत्राची आत्महत्या, हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Bhayandar Local Train Suicide Video : मुंबईच्या भाईंदर रेल्वे स्थानकावर आज (9 जुलै) सकाळी 10.30 वाजता एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. विरारहून चर्चगेटला जाणाऱ्या लोकल ट्रेनसमोर वडील आणि मुलाने एकत्र उडी मारून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मृत वडिलांचे नाव हरीश मेहता (वय 60) आणि मुलाचे नाव जय मेहता (वय 30) आहे. हे दोघेही वसईचे रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.

Bhayandar रेल्वे स्थानका वरील घटना

प्राथमिक माहितीनुसार, मेहता पिता-पुत्र वसईतील वसंत नगरी येथे राहत होते. भाईंदर (Bhayandar) रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वरून हे दोघे विरारच्या दिशेने चालत चालत गेले. जिथे प्लॅटफॉर्म संपला तिथून हे दोघे खाली उतरले आणि रेल्वे रुळावरून चालत काही अंतर गेल्यानंतर चर्चगेटच्या दिशेने येणाऱ्या एका लोकल ट्रेनसमोर स्वतःला झोकून दिले. या घटनेनंतर काही काळ स्थानकात एकच गोंधळ उडाला होता.

रेल्वे पोलिसांनी दोघांचेही मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. वसई रेल्वे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या घटनेचे हृदयद्रावक दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

रेल्वे पोलीस निरीक्षक गणपत तुंबडा यांनी सांगितले की, मेहता पिता-पुत्र यांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट आहे. मात्र, त्यांनी आत्महत्या का केली याचा तपास सुरु आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

धक्कादायक! पुण्यात ‘ऑनर किलिंग’, आंतरधर्मीय विवाहाचा राग!

वसंत मोरेंचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश, उद्धव ठाकरेंनी दिली मोठी जबाबदारी

मोठी बातमी : राज्यातील अनेक जिल्ह्यात भूकंपाचे धक्के: नागरिकांत भीतीचे वातावरण

धक्कादायक : भटक्या कुत्र्याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी तरुणाचा तिघांवर जीवघेणा हल्ला

Mumbai : मुंबईसह कोकणात पावसाची धुवाँधार बॅटिंग सुरू

महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य; १५ व्या कृषी नेतृत्व समितीचा पुरस्कार जाहीर

दिवसा ढवळ्या बिबट्याचा वावर, दुचाकीस्वार थोडक्यात बचावला

मेंदू खाणाऱ्या अमिबाने 14 वर्षांच्या मुलाचा घेतला जीव

रिलसाठी स्टंट करताना दुचाकीवरून तरुणाचा भीषण अपघात, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

संबंधित लेख

लोकप्रिय