Maharajganj : उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातील पीप्रिया गुरु गोविंद राय गावात एक संतापजनक आणि अमानुष घटना घडली आहे. बागेतील आंबे चोरल्याच्या आरोपाखाली तीन निरपराध मुलांना बेदम मारहाण करण्यात आली. आंब्याच्या बागेची देखरेख करण्याची जबाबदारी असलेल्या व्यक्तीने या मुलांवर क्रूर अत्याचार केले. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. (Maharajganj)
मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत संबंधित व्यक्तीने तीन मुलांना एका आंब्याच्या झाडाला बांधून ठेवले आणि त्यांना निर्दयीपणे मारहाण केली. मुलांनी ओरडून मदतीची मागणी करू नये म्हणून त्यांच्या तोंडात आंबे कोंबले गेले. या क्रूरतेचा व्हिडिओ एका व्यक्तीने फोनमध्ये कैद केला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडिओ पाहून लोकांनी संताप व्यक्त केला आहे. (Maharajganj)
व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, तीन मुलांना झाडाला बांधून ठेवले आहे आणि त्यांना मारहाण केली जात आहे. मुलांना धमकी देत बागेत पुन्हा पाऊल ठेवण्यास मनाई केली आणि जर त्यांनी तसं केलं तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी देण्यात आली.
Maharajganj
या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी संताप व्यक्त केला आणि हल्लेखोरावर कडक कारवाईची मागणी केली. स्थानिकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आणि लगेचच पोलिसांनी कार्यवाही करून आरोपीला अटक केली आहे.


हेही वाचा :
पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेतून विद्यार्थ्यांना मिळणार रुपये 60,000 पर्यंत लाभ
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणार 60,000 रूपये
धक्कादायक : 800 हून अधिक विद्यार्थी HIV पॉझिटिव्ह, 47 मुलांचा मृत्यू !
भाईंदर रेल्वे स्थानकावर पिता-पुत्राची आत्महत्या, हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओ व्हायरल
धक्कादायक! पुण्यात ‘ऑनर किलिंग’, आंतरधर्मीय विवाहाचा राग!