Friday, July 12, 2024
Homeताज्या बातम्याSwayam Yojana : पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेतून विद्यार्थ्यांना मिळणार रुपये 60,000...

Swayam Yojana : पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेतून विद्यार्थ्यांना मिळणार रुपये 60,000 पर्यंत लाभ

पुणे, दि.१०: महानगरपालिका, विभागीय शहरे, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेत असलेल्या परंतु वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या भटक्या जमाती-क प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेचा (Pandit Deendayal Upadhyay Swayam Yojana) लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

(Pandit Deendayal Upadhyay Swayam Yojana) योजनेअंतर्गत लाभ घेण्याकरीता पालकांचे उत्पन्न २ लाख ५० हजार रुपये पेक्षा कमी असावे. भटक्या जमाती-क प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना भोजन, निवासभत्ता, निर्वाह मता उपलब्ध करुन देण्यासाठी मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या ठिकाणी ६० हजार, इतर महसुली विभागीय शहरे, उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रात ५१ हजार रुपये, इतर जिल्ह्याचे ठिकाणी ४३ हजार रुपये व तालुक्याच्या ठिकाणी ३८ हजार रुपये इतक्या रकमेचा लाभ देण्यात येतो.

Pandit Deendayal Upadhyay Swayam Yojana

सदर योजनेकरीता असलेला अर्ज महाविद्यालयात देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. अधिक माहिती सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, पुणे कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी पोलीस ठाण्यासमोर, येरवडा, पुणे-६ येथे संपर्क करावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालिका संगिता डावखर यांनी केले आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

धक्कादायक : 800 हून अधिक विद्यार्थी HIV पॉझिटिव्ह, 47 मुलांचा मृत्यू !

भाईंदर रेल्वे स्थानकावर पिता-पुत्राची आत्महत्या, हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओ व्हायरल

धक्कादायक! पुण्यात ‘ऑनर किलिंग’, आंतरधर्मीय विवाहाचा राग!

Pune : पुणे येथे भारती सहकारी बँक अंतर्गत विविध पदांसाठी भरती

वसंत मोरेंचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश, उद्धव ठाकरेंनी दिली मोठी जबाबदारी

मोठी बातमी : राज्यातील अनेक जिल्ह्यात भूकंपाचे धक्के: नागरिकांत भीतीचे वातावरण

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय