Monday, May 20, 2024
Homeजिल्हाहजारो शालेय पोषण आहार कामगार मुंबई मोर्चात सामील 

हजारो शालेय पोषण आहार कामगार मुंबई मोर्चात सामील 

येणाऱ्या निवडणुकीत गद्दारांना जागा दाखवा – कॉ. डॉ. डी.एल.कराड

मुंबई : राज्यातील शालेय पोषण आहार कामगारांच्या विविध मागण्या घेऊन सीटू संलग्न फेडरेशनच्या वतीने आझाद मैदान येथे दि.१३ सप्टेंबर रोजी मोर्चा काढून शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या सह शिक्षण विभागाच्या आयुक्तांना निवेदन देण्यात आले. या मोर्चा मध्ये १५ ते १६ जिल्ह्यातील कामगार उत्स्फूर्तपणे सामील झाले होते. आझाद मैदान येथे दुपारी जाहीर सभा घेण्यात आली. Thousands of school nutrition workers join Mumbai march

सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा राज्यअध्यक्ष कॉ.डॉ.डी.एल.कराड हे या सभेचे प्रमुख वक्ते होते. त्यांनी कामगार – कष्टकरी यांच्यावर होत असलेल्या अन्यायाचा आणि सरकार मार्फत जाणीवपूर्वक केलेल्या हल्याची अभ्यासपूर्ण मांडणी केली. केंद्र आणि राज्य सरकारच्या जनविरोधी धोरणांची चिरफाड केली आणि येणाऱ्या निवडणुकीत मताच्या रुपाने जागा दाखविण्यांचे आवाहन केले. सभेच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे राज्य अध्यक्ष प्राचार्य ए.बी.पाटील हे होते.

यावेळी राज्यभरातून आलेल्या पुढाऱ्यांची देखील लक्षवेधी भाषणे झाली. त्यापैकी कॉ.डॉ.अशोक थोरात, कॉ. प्रभाकर नागरगोजे (बीड) कॉ. मीरा शिंदे (राज्य कोषाध्यक्ष), कॉ. गंगाधर गायकवाड (नांदेड), कॉ. पंजाबराव गायकवाड (बुलडाणा), कॉ.अनिल मिसाळ व कॉ.मधुकर मोकळे (बीड), कॉ. मन्सूर कोतवाल (लातूर) आदींनी सरकारला धारेवर धरले. इतर जिल्ह्यातील पुढाऱ्यांची देखील भाषणे झाली. मोर्चा यशस्वी केल्या बद्दल डॉ. कराड यांनी मोर्चेकऱ्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. समारोप संघटनेचे राज्य अध्यक्ष प्राचार्य ए.बी.पाटील यांनी केला.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय