Monday, May 20, 2024
Homeआंबेगावएसएफआय च्या आंदोलनाला मोठे यश; विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य 

एसएफआय च्या आंदोलनाला मोठे यश; विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य 

घोडेगाव : अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश द्या, सेंट्रल किचन बंद करा. या प्रमुख मागण्यांसोबतच इतर विविध मागण्यांसाठी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया(SFI) च्यावतीने दि.१२ सप्टेंबर २०२३ रोजी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, घोडेगाव येथे बेमुदत मुक्काम आंदोलन सुरू करण्यात आले होते. या आंदोलनाला मोठे यश आले असून विद्यार्थी आंदोलनाचा हा मोठा विजय आहे. SFI’s agitation was a great success; Accept all demands of students

पहिल्या दिवशी घोडेगाव शहरातून मोर्चास सुरूवात झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आपल्या मागण्या मांडल्या. पहिल्या दिवशी प्रशासनासोबत चर्चा निष्फळ झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी घोडेगाव प्रकल्प कार्यालयात मुक्काम करत आंदोलन चालूच ठेवले.

एसएफआय च्या आंदोलनाला मोठे यश; विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य SFI's agitation was a great success; Accept all demands of students

दुसऱ्या दिवशी आंदोलन सुरूच होते. त्यानंतर प्रकल्प कार्यालयातून सुत्रे हालली आणि दुपारी दोन वाजता प्रकल्प अधिकारी, प्रशासन व संघटनेच्या शिष्टमंडळासोबत चर्चा सुरू झाली. 

दुपारी २ वाजेपासून रात्री १० वाजेपर्यंत चाललेल्या ८ तासांच्या दीर्घ चर्चेत मान्य झालेल्या मागण्या पुढीलप्रमाणे :

1. वसतिगृहांची क्षमता ६००० करण्यासंबंधीचा प्रस्ताव गेल्या सहा महिन्यांपासून आयुक्त कार्यालयात धूळखात पडला होता. तो मंत्रालयात मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. लवकरच त्याला मंजुरी मिळेल. 

2. अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल. तर जुन्नर येथे मुलींसाठी एक नवीन इमारत घेण्यात येईल. 

3. सेंट्रल किचन बंद करण्यासंदर्भातील प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास पाठविण्यासाठी आश्रमशाळांमध्ये पालक मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे.

4. जुन्नरच्या वसतिगृहाकडे जाण्यासाठीच्या रस्त्याचा प्रश्न सोडविण्यासाठी निर्णय घेण्यात आला. 

5. नागापूर येथील पोलीस प्रशिक्षण केंद्र दिनांक १५ सप्टेंबर २०२३ पासून सुरू करण्यात येईल.

6. MS-CIT, Tally व Typing चे प्रशिक्षण सुरु करण्याबाबत वरिष्ठ कार्यालयास प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.

7. आश्रमशाळा व वसतिगृहांमधील समस्यांसंदर्भात दिलेल्या निवेदनातील मागण्याबाबत 30 सप्टेंबर पर्यंत कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात आला व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील.

8. अभिषेक गवारी न्याय मिळावा, यासाठी आश्रम शाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या संबंधितांवर कारवाई करण्यात आली आहे. परंतु ती व्यक्ती अजूनही कामावर रुजू असून विद्यार्थ्यांना त्रास देत आहे. त्या व्यक्तीचे वरिष्ठ कार्यालयातून निलंबन होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवण्यात येणार आहे. 

9. आश्रमशाळा, वसतिगृह येथील विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणी वेळेवर करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

10. मुलींच्या आरोग्य तपासणीबाबत मुलींच्या सन्मानाला ठेच पोहचविणारे चूकीचे निर्णय देखील यावेळी रद्द करण्यात आले.

11. प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या इतर समस्या सोडविण्यासाठी प्रकल्प कार्यालयात हेल्प डेस्क निर्माण करून उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला.

12. मंचर वसतीगृहाचा पाण्याचा प्रश्न लवकरच सोडवला जाईल. 

यासोबतच इतर अन्य मागण्या यावेळी मान्य करण्यात आल्या.

तसेच झालेल्या मागण्यांची सोडवणूक व पाठपुरावा करण्यासाठी प्रकल्प कार्यालय व एसएफआय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची समिती गठीत करण्यात आली. या निर्णयांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी दि. ३ ऑक्टोबर २०२३ रोजी बैठक घेण्यात येईल.

शिष्टमंडळात एसएफआयचे राज्य अध्यक्ष सोमनाथ निर्मळ, राज्य सहसचिव विलास साबळे, राज्य समिती सदस्य संदीप मरभळ, जिल्हा अध्यक्ष अविनाश गवारी, जिल्हा सचिव नवनाथ मोरे, जिल्हा सहसचिव प्रविण गवारी, जिल्हा समिती सदस्य राजू शेळके, जुन्नर तालुका सचिव अक्षय घोडे, आंबेगाव तालुका अध्यक्ष दिपक वाळकोळी, सचिव समीर गारे, पुणे शहर अध्यक्ष अक्षय निर्मळ, जिल्हा समिती सदस्य बाळकृष्ण गवारी, योगेश हिले, रोहिदास फलके, निशा साबळे, कांचन साबळे, रोशन पेकरी, गणेश जानकर, सुरज बांबळे, तुषार दाभाडे, वैशाली मुंढे, आकाश लोणकर व विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते.

तसेच यावेळी किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष डॉ. अमोल वाघमारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती प्रकाश घोलप, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय आढारी, संदीप चपटे, किसान सभेचे राजू घोडे, लक्ष्मण जोशी, माकपचे गणपत घोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय