Business 2024 : स्वतः चा व्यवसाय सुरू करू पाहणाऱ्या तरूणांसाठी खूशखबर आहे. नवीन स्टार्टअप उभारण्यासाठी शासनाची योजना सहाय्य करते. (Business)
राज्यातील मराठा अथवा कुणबी समाजातील स्वतःचे स्टार्टअप उभारण्यासाठी सारथी च्या माध्यमातून सहाय्य करण्यात येते.
सरसेनापती संताजी घोरपडे सारथी उद्योजकता विकास उपक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांच्या नवकल्पनेला प्रत्यक्ष स्टार्टअपमध्ये रूपांतरीत करण्यासाठी हे सहाय्य केले जाते. राज्यातील विविध इनक्युबेशन केंद्रांमार्फत अशा विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व अत्यावश्यक सुविधा पुरविण्यात येतात.
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थे (सारथी) मार्फत ही योजना उपलब्ध करून देण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील रिसर्च पार्क फाउंडेशनसाठी नोंदणीची मुदत वाढवून देण्यात आली आहे.
आता 30 एप्रिल 2024 पर्यंत इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात. जास्तीत जास्त उमेदवारांनी नोंदणी करावी, असे आवाहन विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले आहे. मराठा किंवा कुणबी गटातील नवउद्योजकांची एक वर्षासाठी याद्वारे निवड करण्यात येते.
नियम व अटी :
सदर विद्यार्थी किमान पदवीधर असावा.
विद्यार्थ्यांकडे स्वतःची तंत्रज्ञान व्यवसाय कल्पना असावी.
एका वर्षामध्ये त्याने कल्पनेचे रूपांतर स्केलेबल टेक्नॉलॉजी बिझनेस स्टार्टअपमध्ये करणे आवश्यक आहे.
आर्थिक साहाय्य दिलेल्या काळात विद्यार्थ्यांनी उद्योजकीय आकांक्षेसाठी पूर्ण वेळ पाठपुरावा आवश्यक आहे
उद्योजकता विकास उपक्रमात सहभागी होण्यासाठी अर्ज करा – https://sarthi-maharashtragov.in/
राज्यातील इनक्युबेशन केंद्रे आणि उपलब्ध जागा :
(i) एसपीपीयू रिसर्च पार्क फाउंडेशन, पुणे – 10 जागा
(ii) उद्यम सोलापुर विद्यापीठ इनक्युबेशन सेंटर, सोलापूर – 10 जागा
(iii) शिवाजी सेंटर फॉर इनोव्हेशन, इनक्युबेशन अॅन्ड लिंकेजेस, कोल्हापूर – 10 जागा
(iv) मराठवाडा एक्सलरेटर फॉर ग्रोथ अॅन्ड इनक्युबेशन कॉंन्सिल, छत्रपती संभाजीनगर – 10 जागा
(v) नेत्ररित फाउंडेशन, सांगली – 10 जागा
(vi) जी. एच. रायसोनी टेक्नॉलॉजी बिझनेस इनक्युबेटर फाउंडेशन, नागपूर – 10 जागा
हे ही वाचा :
ब्रेकिंग : EVM बाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
कांदा निर्यातीच्या धोरणावरून डॉ. कोल्हे यांचा केंद्र सरकारवर जोरदार हल्ला
मोठी बातमी : माजी आमदार जे.पी.गावित यांना माकप कडून उमेदवारी जाहीर
मोठी बातमी : शिवसेना ठाकरे गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा काय आहेत घोषणा !
मोठी बातमी : राष्ट्रवादी शरद पवार गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा कोणकोणत्या केल्या घोषणा !
’महामानव विश्वकाव्य दर्शन काव्यसंग्रह’ निर्मितीसाठी साहित्य पाठविण्याचे बार्टीकडून आवाहन
शिरूर लोकसभेसाठी 46 उमेदवारांचे 58 अर्ज
देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार आहे तरी कोण ?, वाचा सविस्तर !