Tuesday, May 14, 2024
Homeताज्या बातम्याAjit Pawar : '…तेव्हा मी मुख्यमंत्री होईल', अजित पवार यांचे सूचक विधान

Ajit Pawar : ‘…तेव्हा मी मुख्यमंत्री होईल’, अजित पवार यांचे सूचक विधान

राजगुरुनगर : ‘ज्या वेळेस दिलीप मोहिते पाटील मंत्री होतील, तेव्हा मी मुख्यमंत्री होईल’, असे सूचक विधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले आहे. त्यांचे हे विधान सध्या चांगलेच चर्चेत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी लढवणाऱ्या संभाव्य लोकसभा मतदारसंघात दौरे सुरू केले आहेत. बुधवारी 20 मार्च रोजी अजित पवार यांनी खेड तालुक्याचा दौरा करत कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या.

आंबेगाव, जुन्नर, खेड, शिरूर, भोसरी या भागांचा दौरा अजित पवारांनी केला. यावेळी त्यांनी खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपद मिळण्याबाबत एक मिश्किल टोला लगावत मोहिते पाटील यांना कोपरखळी मारली.

अजित पवार पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत असताना त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी अजित पवार मुख्यमंत्री व्हायला पाहिजे, अशी मागणी केली. कार्यकर्त्यांच्या या मागणीवर अजित पवार यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत विधान केले. त्यांचे हे विधान चांगलेच चर्चेत आले. ‘ज्या वेळेस दिलीप मोहिते पाटील मंत्री होतील, तेव्हा मी मुख्यमंत्री होईल’, असे अजित पवार म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने लोकसभेची जोरदार तयारी केली आहे. पुण्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघ अजित पवार गट लढवण्यासाठी इच्छुक आहे. राष्ट्रवादीकडून शिवाजीराव आढळराव पाटील निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे.

whatsapp link

हे ही वाचा :

मोठी बातमी : राज्यातील ‘या’ भागात भुकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

शिरूर लोकसभा मतदारसंघात “या” दोन उमेदवारांमध्ये सामना जवळपास निश्चित

Mirzapur 3 : मिर्झापूरच्या तिसऱ्या सिझनच्या रिलीज संदर्भात महत्वाची माहिती समोर

ब्रेकिंग : प्रकाश आंबेडकर यांचा लेटर बाँब, महाविकास आघाडी नव्हे तर ‘या’ पक्षाकडे युतीचा प्रस्ताव

ब्रेकिंग : राज ठाकरे आणि अमित शहांची भेट, राज ठाकरें लवकरच मोठा निर्णय घेणार

ब्रेकिंग : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात महत्वाची घडामोड

बाबा रामदेव यांना झटका; सर्वोच्च न्यायालयाची अवमान नोटीस

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय