Saturday, May 11, 2024
Homeताज्या बातम्याBaba Ramdev : बाबा रामदेव यांना झटका; सर्वोच्च न्यायालयाची अवमान नोटीस

Baba Ramdev : बाबा रामदेव यांना झटका; सर्वोच्च न्यायालयाची अवमान नोटीस

Supreme court × Baba Ramdev : सर्वोच्च न्यायालयाने बाबा रामदेव (Baba Ramdev) आणि पतंजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण (Acharya Balkrishna) यांना अवमानाची नोटीस बजावून दोघांनाही पुढील दोन आठवड्यात न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. Patanjali

पतंजलीच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. सुप्रीम कोर्टाने याअगोदरही बाबा रामदेव (Baba Ramdev) याना नोटीस बजावत कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते. रामदेव बाबा आणि बालकृष्ण यांनी प्रथमदर्शनी कायद्याचे उल्लंघन केले आहे. यामुळे न्यायालयाच्या अवमाननेनुसार कारवाई का करू नये? असा प्रश्न करत सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे.

सविस्तर वृत्त असे की, पतंजली आयुर्वेद जाहिरातीकरून खोटे दावे करत आहे आणि दिशाभूल करण्याचे काम करत आहे, असा आरोप करत इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने पतंजली विरोधात याचिका दाखल केली होती. 27 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने पतंजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक बाळकृष्ण आणि रामदेव यांच्याकडून तीन आठवड्यांत उत्तर मागितले होते. यासोबतच दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवरही बंदी घालण्यात आली आहे. मात्र रामदेव आणि बाळकृष्ण यांच्याकडून न्यायालयाला कोणतेही उत्तर मिळाले नाही.

यावरून आज न्यायमूर्ती हिमा कोहली आणि अमानुल्ला यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची दखल घेत बाबा रामदेव (Baba Ramdev) आणि आचार्य बाळकृष्ण (Acharya Balkrishna) यांना अवमानाची नोटीस बजावली असून पुढील दोन आठवड्यात न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

whatsapp link

हे ही वाचा :

Police Bharti : पोलीस भरती प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता !

Pune : कांद्याच्या दरात घसरण; शेतकरी हवालदिल

मोठी बातमी : सर्वोच्‍च न्‍यायालयाने स्टेट बँकेला पुन्हा धरले धारेवर

अजमेर मध्ये रेल्वेचा भीषण अपघात, ४ डबे रुळावरून घसरले रुळही उखडले

मोठी बातमी : कोल्हापुरात भीषण अपघात ट्रकने ४ मजुरांना चिरडले तर ८ गंभीर जखमी

मी पुन्हा आलो पण येताना दोन्ही पक्ष फोडूनच आलो देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य

ब्रेकिंग : शिंदे गटाच्या आमदाराच्या गाडीवर हल्ला

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय