Thursday, May 9, 2024
Homeताज्या बातम्याSharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात महत्वाची घडामोड

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात महत्वाची घडामोड

Sharad Pawar Ajit Pawar NCP : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) अधिकाराबाबत महत्वाचा निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाने शरद पवार गटाला (Sharad Pawar) आगामी लोकसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्ष नावाने आणि तुतारी वाजवणारा माणूस या निवडणूक चिन्हावर लढवण्यास परवानगी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी न्यायमूर्ती सूर्यकांत आणि के.व्ही. विश्वनाथन यांच्या खंठपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी आगामी निवडणूकीसाठी शरद पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह मिळाले आहे. तर अजित पवार गटाला (Ajit Pawar) अटी शर्थींसह घड्याळ चिन्ह वापरता येणार आहे असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

अजित पवार गटाला घड्याळ चिन्ह न देण्याची याचिका शरद पवार गटाने (Sharad Pawar) केली होती. सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावत अजित पवार यांना अटी शर्थींसह घड्याळ चिन्ह देण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय आता कायम ठेवला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला शरद पवार गटाचे नाव आणि निवडणूक चिन्ह आरक्षित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे शरद पवार पक्षाचे अधिकृत नाव राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असे असेल तर चिन्ह तुतारी वाजणारा माणूस असणार आहे.

वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध द्यावी

यासोबतच लोकसभा निवडणुकीसाठी घड्याळ हे निवडणूक चिन्ह तुम्हाला आरक्षित करण्यात आलेले आहे, अशी नोटीस हिंदी, इंग्रजी आणि मराठी वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला दिले आहे. तसेच ऑडिओ आणि व्हिडीओ क्लिप आणि पॅम्पलेटच्या माध्यमातूनही ही माहिती द्यावी, असेही सांगितले. अजित पवार गटाला घड्याळ चिन्ह कायमस्वरूपी मिळाले नसून ते आगामी लोकसभा आणि विधानसभेसाठी वापरण्यासाठी दिले आहे. चिन्ह सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून आहे, असे प्रत्येक पोस्टरवर लिहावे लागणार आहे”, असे निर्देशही कोर्टाने दिले आहेत.

whatsapp link

हे ही वाचा :

बाबा रामदेव यांना झटका; सर्वोच्च न्यायालयाची अवमान नोटीस

Police Bharti : पोलीस भरती प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता !

Pune : कांद्याच्या दरात घसरण; शेतकरी हवालदिल

मोठी बातमी : सर्वोच्‍च न्‍यायालयाने स्टेट बँकेला पुन्हा धरले धारेवर

अजमेर मध्ये रेल्वेचा भीषण अपघात, ४ डबे रुळावरून घसरले रुळही उखडले

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय