Saturday, May 18, 2024
Homeग्रामीणशहरातील झोपडपट्टी वासीयांना गैरसोयींच्या खाईतून बाहेर काढणार : दिपक साळुंखे पाटील

शहरातील झोपडपट्टी वासीयांना गैरसोयींच्या खाईतून बाहेर काढणार : दिपक साळुंखे पाटील

सांगोला : सांगोला शहरातील संजय नगर इंदिरा नगर सह झोपडपट्टीवासीयांच्या ज्वलंत समस्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत शहरातील या झोपडपट्टी वासियांच्या समस्यांचे आपण तात्काळ निवारण करून झोपडपट्टी वासीयांना अस्वच्छता व गैरसोयीच्या खाईतून बाहेर काढू असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार दिपक साळुंखे पाटील यांनी व्यक्त केला. 

सांगोला नगरपालिकेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे बांधकाम अभियंते आकाश करे तसेच नगरसेवक सोमनाथ लोखंडे, जुबेर मुजावर, नाथा जाधव, आनंद घोंगडे, माजी नगराध्यक्ष अनिल खडतरे, नगरसेविका भामाबाई जाधव, स्वाती मस्के आदींसह शनिवार दि. 11 सप्टे. रोजी साळुंखे पाटील यांनी झोपडपट्टी भागाचा पाहणी दौरा केला, व येथील नागरिकांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.

गेल्या अनेक वर्षांपासून सांगोला शहरातील इंदिरानगर संजयनगर परिसर तसेच सांगोला रेल्वे स्टेशन परिसरातील झोपडपट्टीवासीयांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. नगरपालिकेत या प्रभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मंडळींनी आश्वासनाची खैरात करूनही वारंवार येथील जनतेचा अपेक्षा भंग झालाआहे. म्हणून परिसरातील महिलांनी आपली व्यथा सांगोला येथील राष्ट्रवादी भवन येथे येऊन राष्ट्रवादीचे राज्याचे उपाध्यक्ष दिपक साळुंखे पाटील यांकडे मांडली होती. 

या वेळी मी स्वतः तुमच्या परिसरात येऊन तुमच्याशी संवाद साधेल आणि तुमच्या समस्या जाणून घेईल असे अभिवचन त्यांनी झोपडपट्टी परिसरातील महिलांना दिले होते, यानुसार शनिवारी सांगोला नगरपालिकेचे मुख्याधिकारी बांधकाम अभियंते विद्युत वितरण विभागाचे कर्मचारी स्वच्छता विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच नगरसेवकांना घेऊन दिपकआबांनी या परिसराचा पाहणी दौरा केला व येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. अनेक वर्षांपासून पिण्याचे शुद्ध पाणी, गटार, पक्के रस्ते, राहण्यासाठी पक्की घरे, वीज, पथदिवे यांसह स्वच्छता असे मूलभूत प्रश्न येथील नागरिकांना सतावत आहेत. यावेळी येथील नागरिकांनी आपल्या समस्यांचा पाढाच दिपकआबांसमोर वाचून दाखवला. यावर राज्यातील महाविकास आघाडी सरकार, सांगोला तालुक्याचे आमदार शहाजी पाटील व संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगोला शहरातील झोपडपट्टी वासीयांच्या समस्या दूर करण्यासाठी येथील नागरिकांच्या पाठीशी असल्याचे अभिवचन उपस्थितांना दिले.

यावेळी बहुजन समाज पार्टीचे तालुकाध्यक्ष मिलिंद बनसोडे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या विधानसभा मतदार संघ अध्यक्षा सुचिताकाकी मस्के, तालुका अध्यक्षा सखुबाई वाघमारे, दिलीपकाका मस्के, राहुल मस्के, प्रताप मस्के, रवी मस्के, संतोष मस्के, भारत गडहिरे, अकबर बागवान, मुन्ना बागवान, साजिद बागवान, बागवान गुरुजी, रज्जाक बागवान, पांचभाई, शफोउद्दीन बागवान आदींसह झोपडपट्टी परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आरोग्य विषयक कामांना तात्काळ सुरुवात करणार

शनिवारी झोपडपट्टी परिसरात माजु आमदार  दिपक साळुंखे पाटील तसेच नगरसेवक व नगरपालिकेचे कर्मचारी यांच्यासोबत केलेल्या पाहणीत येथील नागरिकांनी आरोग्यविषयक अनेक समस्या मांडल्या. पिण्याचे पाणी, गटार तसेच अन्य आरोग्य विषयक कामांना नगरपालिका प्रशासन तात्काळ सुरुवात करेल. व येथील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेईल 

– कैलास केंद्रे, मुख्याधिकारी


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय