Saturday, May 18, 2024
Homeकृषी'लेटर टू डेअरी मिनिस्टर' अभियाना अंतर्गत खेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाठवली शेकडो पत्रे

‘लेटर टू डेअरी मिनिस्टर’ अभियाना अंतर्गत खेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाठवली शेकडो पत्रे

खेड ‘लेटर टू डेअरी मिनिस्टर’ अभियाना अंतर्गत खेड तालुक्यातून शेकडो दूध उत्पादक शेतकऱ्यांनी विविध मागण्यांचे पत्र दुग्धविकास मंत्र्यांना पाठवली.

अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने राज्यभरात ‘लेटर टू डेअरी मिनिस्टर अशी मोहिम सुरू आहे.

हे वाचा ! जुन्नर : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, घरातील २१ तोळे सोनेही केले लंपास

गायीच्या दुधाला प्रति लिटर ३५ रुपये व म्हशीच्या दुधाला प्रति लिटर ६० रुपये दर द्या. लॉकडाऊन काळातील लुटवापसी म्हणून शेतकऱ्यांना प्रति लिटर ५ रुपये अनुदान द्या. खाजगी व सहकारी दूध संघांना लागू होईल असा लूटमार विरोधी कायदा करा. दुधाला एफ.आर.पी. आणि रेव्हेन्यू शेअरींगचे कायदेशीर संरक्षण द्या. अनिष्ट ब्रँड वॉर रोखण्यासाठी ‘एक राज्य एक ब्रँड’ हे धोरण स्वीकारा. भेसळ मुक्तीची कायदेशीर हमी द्या. सदोष मिल्को मिटर द्वारे होणारी लुट थांबविण्यासाठी निरीक्षकांची नेमणूक करा. शासकीय अनुदानातून पशु विमा योजना सुरु करा. राज्यात दुध मूल्य आयोगाची स्थापना करा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

हे पहा ! पुणे : मंडल अधिकारी रिना मडके यांचे अपघाती निधन !

खेड तालुक्यातून पत्र पाठविण्यासाठी किसान सभेचे अमोद गरुड, महेंद्र थोरात, विकास भाईक, किसनराव ठाकूर, भाऊसाहेब सरडे यांनी पुढाकार घेतला.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय