Monday, May 6, 2024
Homeराज्य10 वी, 12 वीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाची प्रतिक्षा संपली, या तारखेला लागणार निकाल

10 वी, 12 वीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाची प्रतिक्षा संपली, या तारखेला लागणार निकाल

मुंबई : राज्यातील सीबीएससीचा निकाल नुकताच लागला आहे. त्यानंतर आता राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल लवकरच लागणार आहे. बोर्डाकडून निकालाची तयारी सुरू झाली असून बारावीचा निकाल 31 मे च्या दरम्यान लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च दरम्यान पार पडली होती. या परिक्षेत 14 लाख विद्यार्थी बसले होते. तर दहावीच्या परीक्षेला राज्यातून 15,77,256 विद्यार्थी बसले होते. राज्य मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, बारावीचा निकाल मे महिन्यातच तर दहावीचा जूनच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता दहावी, बारावीचा निकाल कधी लागणार याची उत्सुकता विद्यार्थी आणि पालकांची संपली आहे.

असा पहा निकाल
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झाल्यानंतर बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहाता येणार आहे.

www.mahresult.nic.in

www.hscresult.mkcl.org

www.mahahhscboard.in

दरम्यान, या आधी 10 वीचा निकाल 10 जूनला लागेल अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून देण्यात आल्याने 10 वी च्या विद्यार्थ्यांसह पालकांची धाकधूक वाढली आहे.

हे ही वाचा :

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या १ हजार ९२६ कोटींच्या अर्थसंकल्पास मान्यता

त्र्यंबकेश्वर मंदिर घटनेप्रकरणी गृहमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल; दिले “हे महत्वाचे” आदेश

चित्रपटगृहांमध्ये मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यासंदर्भात कार्यप्रणाली तयार करण्यात येणार

आयटीआय कंत्राटी निदेशकांचे मानधन वाढ, राज्य सरकारचा निर्णय

झेडपीच्या सरळसेवा भरतीसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर

UPSC मार्फत 12वी ते पदवीधरांसाठी मोठी भरती जाहीर

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय