नाशिक : त्रंबकेश्वरमध्ये शनिवारी म्हणजेच १३ मे रोजी, काही इतर धर्मीय तरुणांनी ज्योतिर्लिंग असलेल्या मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावरुन मोठा वादंग निर्माण झालाय. मंदिर बंद झालेलं असतानाही इतर धर्मियांतील काही तरुण मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत होते. या प्रकरणाची गंभीर दखल राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. या प्रकरणी एफआयआर (FIR) नोंदवून अत्यंत कडक कारवाई करण्याचे आदेश फडणवीस यांनी दिले आहेत.
चौकशीसाठी एसआयटी गठीत होणार
या घटनेची पूर्ण चौकशी करण्यासाठी गृहमंत्री फडणवीस यांनी अतिरिक्त पोलीस महासंचलाक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेतत एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. ही एसआयटी केवळ यावर्षीच्या घटनेची चौकशी करणार नाही तर गेल्या वर्षीसुद्धा घडलेल्या अशाच घटनेची चौकशी करणार आहे.
ब्राह्मण महासंघाचा आंदोलनाचा इशारा
अशा प्रकारे विशिष्ठ समाजाचे तरुण या ठिकाणी एकत्र का आले, अशी विचारणा ब्राह्मण महासंघानं केली आहे. मंदिरात हिंदूंशिवाय कोणालाही प्रवेश नाही, हे स्पष्ट असताना उत्तर दरवाजातून शिरण्याचा प्रयत्न करण्यात आल्यानं काही काळ तणाव निर्माण झालाय. या प्रकरणात चौकशी करण्याची मागणी करण्यात आलीय.
उरुसात धूप दाखवण्यासाठी गेल्याचं स्पष्टीकरण
दरवर्षी त्रंबकेश्वरमध्ये असलेल्या उरुसात देवाला धूप दाखवण्यात येतो, त्यासाठी या ठिकाणी गेल्याचं उरुसात सहभागी असलेल्यांनी सांगितलेलं आहे. गेल्या वर्षीही मंदिरात यासाठी गेल्याचं त्यांनी सांगितंलय. मात्र यावर्षी यावरुन वाद झाल्याचं सांगण्यात येतंय. त्यांना परावनगी नाकारण्यात आल्यानंतर या तरुणांनी हुज्जत करण्याचा प्रयत्न केला. मंदिराच्या पदाधिकाऱ्यांनी या दोन धर्मांत तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचं सांगत या प्रकरणी तक्रार दाखल केली होती.
हे ही वाचा :
आयटीआय कंत्राटी निदेशकांचे मानधन वाढ, राज्य सरकारचा निर्णय
झेडपीच्या सरळसेवा भरतीसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
UPSC मार्फत 12वी ते पदवीधरांसाठी मोठी भरती जाहीर
गौतमी पाटील ने साताऱ्यात जाऊन छत्रपती उदयनराजे भोसलेंना दिली “ही” बाटली भेट..
सैन्यदलातील अधिकारी पदभरती परीक्षेच्या पूर्व प्रशिक्षणाची युवकांना संधी