सातारा : महाराष्ट्रातील तरुणांच्या हृदयावर अधिराज्य करणारी सुप्रसिद्ध नृत्यांगना, प्रसिद्ध लावणी कलावंत गौतमी पाटील हे नाव सध्या राज्यभरात ट्रेंडिंगला आहे. गौतमीच्या लावणीच्या कार्यक्रमाला मोठी गर्दी होत असते. गौतमी पाटील आणि युवकांचा राडा हे एक समीकरण झाले आहे.अनेक ठिकाणी तिच्या कार्यक्रमात गोंधळ निर्माण झाल्याचे देखील पाहायला मिळाले.
गौतमी पाटीलने काल खासदार उदयनराजे भोसले यांची त्यांच्या साताऱ्यातील जलमंदिरया निवासस्थानी भेट घेतली. यावेळी खासदार उदयनराजे यांच्यासोबत विविध विषयावर चर्चा झाली. त्यानंतर तिने प्रसारमाध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली की, “महाराजांना मी पहिल्यांदाच भेटले. त्यांचा आशीर्वाद कायम सोबत राहावा यासाठी मी छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. महाराजांना परफ्यूम खूप आवडतो, असे मला समजले होते. त्यामुळे आम्ही महाराजांना परफ्यूम ची बाटली गिफ्ट केली.”
पुढे गौतमी म्हणाली की, “छत्रपती उदयनराजे यांची भेट घेतल्यानंतर खूप छान वाटलं. महाराजांची भेट होईल असं मला वाटले नव्हते. महाराजांचा स्वभाव खूप छान आहे. त्यांना भेटून खूप छान वाटले. त्यांना कलाकारांची खूप जाण आहे, म्हणून मला त्यांचा अभिमान वाटतो. छत्रपती उदयनराजे भोसले हे आमचं दैवत आहेत. त्यामुळं मी त्यांच्यापेक्षा मोठी नाही.”
गौतमी पाटील ने साताऱ्यात जाऊन छत्रपती उदयनराजे भोसलेंना दिली “ही” बाटली भेट..
- Advertisement -