Sunday, May 19, 2024
Homeनोकरीझेडपीच्या सरळसेवा भरतीसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर

झेडपीच्या सरळसेवा भरतीसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर

ZP Recruitment 2023 : राज्यातील जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या गट ‘क’ मधील सर्व संवर्गातील पदे भरण्यात येणार आहेत. परंतु, यामधील वाहनचालक आणि गट ‘ड’ मधील पदे वगळून उर्वरित पदे सरळसेवेमार्फत भरण्यात येणार आहेत. त्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना सोमवारी जाहीर करण्यात आल्या. (Zilla Parishad Bharti Update)

राज्यातील जिल्हा परिषदेच्या भरतीसाठी नुकताच अभ्यासक्रम निश्चित करण्यात आला होता. त्यानंतर सोमवारी गट ‘क’ सर्व संवर्गातील भरतीसाठी वयोमर्यादेत दोन वर्षांची सूट देण्यात आली आहे. तशा मार्गदर्शक सूचना राज्य प्रशासनाचे उपसचिव पो. द. देशमुख यांनी जारी केल्या आहेत.

दरम्यान, या निर्णयामुळे खुल्या प्रवर्गासाठी ४०, तर मागासवर्गीयांसाठी ४५ वर्षे वयोमर्यादा विचारात घेतली जाणार आहे. जिल्हा परिषदेतील कर्मचारी भरतीला येत्या जुलैअखेरीस सुरुवात केली जाणार आहे. कनिष्ठ सहायक या पदाकरिता यापूर्वी मॅट्रिक उत्तीर्ण अशी शैक्षणिक पात्रता होती. त्यामध्ये बदल करून आता या संवर्गासाठी पदवी परीक्षा उत्तीर्ण असावी लागेल.

∆ आदेशात काय म्हटलंय ?

● अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) सरळसेवेची पदे निश्चित करून ती भरण्याची दक्षता घ्यावी.

● अनुसूचित क्षेत्रातील पदे स्थानिक अनुसूचित जमातीतील उमेदवारांमधून भरताना स्थानिक अनुसूचित क्षेत्रात काम करणारे बिगर अनुसूचित जमातीचे कर्मचारी अथवा बिगरअनुसूचित क्षेत्रात काम करणाऱ्या अनुसूचित जमातीच्या उमेदवारांच्या समायोजनेची प्रक्रिया ही नव्याने निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यापूर्वी पार पाडावी.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

 स्टाफ नर्स पदाच्या 3900+ जागांसाठी मेगा भरती, आजच करा अर्ज

 पुणे येथे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी अंतर्गत विविध पदांची भरती

 जलसंपदा विभाग सातारा अंतर्गत विविध पदांची भरती

 भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत विविध पदांची भरती

 IOCL : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती

 RBI : भारतीय रिझर्व्ह बँकेत ग्रेड बी पदांची बंपर भरती

नागपूर येथे महाराष्ट्र पोलीस विभाग अंतर्गत भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय