Friday, November 22, 2024
Homeराज्यडॉ. तात्याराव लहाने यांच्यासह 'त्या' आठ जणांचे राजीनामे मंजूर

डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह ‘त्या’ आठ जणांचे राजीनामे मंजूर

मुंबई : सर जे जे रुग्णालयाच्या नेत्र शल्यचिकित्साशास्त्र विभागप्रमुख आणि प्राध्यापक डॉ. रागिणी पारेख आणि महाराष्ट्र अंधत्व प्रतिबंध अभियानाचे समन्वयक सेवानिवृत्त सहसंचालक डॉ. तात्याराव लहाने यांसह सात अध्यापकांचे राजीनामे शासनाने शनिवारी मंजूर करून त्यांना कार्यमुक्त केले. निवासी डॉक्टरांनी केलेल्या चुकीच्या तक्रारीमुळे या ९ जणांनी ३१ मे रोजी शासनाकडे राजीनामे दिले होते.

गेल्या काही दिवसांपासून निवासी डॉक्टर विरुद्ध नेत्र शल्यचिकित्साशास्त्र विभागप्रमुख आणि माजी विभागप्रमुख असा संघर्ष सुरू आहे. त्यामुळे रुग्णालयातील सर्व निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत.

मानसेवी सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत असणारे डॉ. प्रीतम सामंत, डॉ. दीपक भट, डॉ. शशी कपूर, डॉ. स्वरणजीत सिंग भट्टी, डॉ. हेमालिनी मेहता, डॉ. अश्विन बाफना यांचे आणि सहायक प्राध्यापक म्हणून करार तत्त्वावर कार्यरत असणाऱ्या डॉ. सायली लहाने यांच्यासह सर्वांचे राजीनामे शासनातर्फे मंजूर करण्यात आले आहेत.

डॉ. रवी चव्हाण यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार

सर जे जे रुग्णालयातील प्राध्यापक नेत्र शल्यचिकित्साशास्त्र पदाची जागा रिक्त झाल्याने प्रशासकीय कारणास्तव नागपूर येथील इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय नेत्र शल्यचिकित्साशास्त्र प्राध्यापक डॉ. रवी चव्हाण यांच्याकडे जे जे रुग्णालयातील प्राध्यापक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.

 हे ही वाचा :

अक्षय भालेराव या तरूणाचा जातीयवादी सनातनी विचारांच्या गुंडांनी केलेला खून – प्रकाश आंबेडकर

PMC : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती

थांबवा फसवणुकीचा प्रकार; असे करा अपडेट ‘आधार’

देशातील पहिलं “आधार कार्ड” कोणाचे बनले माहिती आहे का? नसेल तर वाचा !

ठाकरे गटाला पुन्हा धक्का; नवी मुंबई व नाशिकमधील पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

महाराष्ट्र हादरला : गावात भीम जयंती साजरी करता का?’ असा सवाल करत दलित तरूणाची हत्या

युवक/युवतींना उद्योजक बनण्याची सुवर्णसंधी ! मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना आहे तरी काय ? वाचा सविस्तर !

संबंधित लेख

लोकप्रिय