Saturday, April 20, 2024
Homeग्रामीणशासन आपल्या दारी कार्यक्रमांतर्गत जुन्नर येथे शिबीराचे आयोजन

शासन आपल्या दारी कार्यक्रमांतर्गत जुन्नर येथे शिबीराचे आयोजन

उम्मत की खिदमत आणि मुस्लिम यंग सर्कल, जुन्नर यांच्यामार्फत शिबिराचे आयोजन 

जुन्नर (रफिक शेख तकी) :  महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने संपूर्ण राज्यभर सुरू असलेल्या शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत सर्वसामान्य नागरिकांना विविध नागरी सुविधा सहजतेने पुरवण्यासाठी महसूल विभागाच्या वतीने गावागावातून शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे. 

याच पार्श्वभुमीवर तहसीलदार कार्यालय जुन्नर यांच्या मार्गदर्शनाखाली उम्मत की खिदमत आणि मुस्लिम यंग सर्कल, जुन्नर यांच्या वतीने अंजुमन उर्दू हायस्कूल येथे अल्पसंख्यांक मुस्लिम समाजासह सर्वांसाठी जात व आर्थिक मागास प्रमाणपत्र शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याची माहिती शिबिराचे मुख्य आयोजक हाजी गुलाम नबी शेख यांनी दिली.

या शिबिराचे उद्घाटन जुन्नर तालुक्याचे तहसीलदार रवींद्र सबनीस यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी मंडलाधिकारी व्यंकटेश भोसले, तलाठी प्रमोद इंगळे, प्रकाश राठोड, नामदेव सोनवणे, अंजुमन शाळेच्या मुख्याध्यापिका नर्गिस तांबोळी, रेश्मा शेख, मुन्ना सय्यद, मेहबूब काझी, मोबीन शेख, इसाक पठाण, हाफिज मोसीन, गणपत रोकडे, एजाज चौधरी, रफऊ खान, रऊफ इनामदार रफिक तकी, जहीर इनामदार, कुतबेआलम पिरजादे, मजहर तिरंदाज, अशपाक तिरंदाज, सोफियान बेग, फिरोज सुब्राते जहीर इनामदार, माजीत शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

शिक्षणासाठी समाजातील सर्व स्तरातील व्यक्तींनी समाजासाठी एकत्र येऊन प्रयत्न करावेत. प्रशासनातील सर्व विभागांची मदत समाजासाठी उपलब्ध केली जाईल. विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक दाखल्यांची उपलब्धता केली जाईल असे मनोगत तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी यावेळी व्यक्त केले.

या शिबिरा अंतर्गत 130 लाभार्थींची माहिती व अर्ज संकलन करण्यात आली. लवकरात लवकर या सर्व लाभार्थी नागरिकांना व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येईल असेही तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी सांगितले.

उम्मत की खिदमत आणि मुस्लिम यंग सर्कल, जुन्नर यांच्यावतीने सातत्याने लोकाभिमुख उपक्रम राबविले जात आहेत. भविष्यातही विद्यार्थी व शिक्षण प्रेमी नागरिकांसाठी उपयुक्त उपक्रमांचे आयोजन सातत्याने करण्यात येईल, असे हाफिज रिजवान व वाजीद इनामदार यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. साजिद खान यांनी केले सूत्रसंचालन प्रा. अल्ताफ इनामदार यांनी केले व आभार तौसीफ आतार यांनी मानले.

 हे ही वाचा :

अक्षय भालेराव या तरूणाचा जातीयवादी सनातनी विचारांच्या गुंडांनी केलेला खून – प्रकाश आंबेडकर

PMC : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती

थांबवा फसवणुकीचा प्रकार; असे करा अपडेट ‘आधार’

देशातील पहिलं “आधार कार्ड” कोणाचे बनले माहिती आहे का? नसेल तर वाचा !

ठाकरे गटाला पुन्हा धक्का; नवी मुंबई व नाशिकमधील पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

महाराष्ट्र हादरला : गावात भीम जयंती साजरी करता का?’ असा सवाल करत दलित तरूणाची हत्या

युवक/युवतींना उद्योजक बनण्याची सुवर्णसंधी ! मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना आहे तरी काय ? वाचा सविस्तर !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय