Friday, March 28, 2025
---Advertisement---
---Advertisement---

मोठी बातमी : ‘त्या’ प्रकरणात राहुल गांधी यांना जामीन मंजूर, १३ एप्रिलला होणार पुढील सुनावणी

सुरत : मानहानी प्रकरणातील शिक्षेविरुद्ध काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या संदर्भातील एक मोठी अपडेट येत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोदी आडनावाबाबत केलेल्या वक्तव्या प्रकरणी सूरत न्यायालयाने जामीन मंजूर केला. आज सकाळी राहुल गांधी काँग्रेस नेत्या आणि बहीण प्रियांका गांधी यांच्यासोबत सूरतमध्ये न्यायालयात पोहोचले. त्यांच्या सोबत इतर काँग्रेस नेतेही उपस्थित होते.

---Advertisement---

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सूरत कोर्टात मोदी आडनावावरून झालेल्या शिक्षेविरोधात सोमवारी सूरत सत्र न्यायालयात याचिका दाखल केली. यात राहुल गांधी यांच्यावतीने दोन अर्ज दाखल करण्यात आले होते. या सुनावणीत राहुल गांधी यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला. आता पुढील सुनावणी १३ एप्रिल रोजी होणार आहे.

तसेच, शिक्षेविरोधातील याचिकेवर ३ मे रोजी पुढची सुनावणी असणार आहे. जर या शिक्षेला न्यायालयाने स्थगिती दिली तर राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व पुन्हा मिळू शकते. मात्र यासाठी वेळ लागू शकतो.

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles