Sunday, March 16, 2025

मोठी बातमी : काँग्रेसचा हा मोठा नेता लोकसभेपूर्वीच भाजपमध्ये जाणार

मुंबई : राज्यभरात महाविकास आघाडीच्या वतीने संयुक्त सभा पार पडत आहे. काल पहिलीच छत्रपती संभाजीनगरमध्ये पहिली सभा पार पडली. या सभेमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्ष नेते अजित पवार, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह अशोक चव्हाण यांनी देखील उपस्थित होते. अशात आता लोकसभेपूर्वीच काँग्रेसमध्ये मोठा भूकंप होणार असल्याचा दावा शिवसेनेच्या (शिंदे गटा) च्या आमदाराकडून करण्यात आला आहे.

राज्यात सुरू असलेल्या राजकीय हालचाली दरम्यान शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील, असा दावा केला आहे. अशोक चव्हाण हे भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा अधूनमधून होत असते. आता पुन्हा संजय शिरसाट यांच्या विधानाने राजकिय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

आमदार शिरसाट म्हणाले की, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जातील, अशी माझी खात्रीलायक माहिती आहे. माझं त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही. मी तेवढ्या उंचीचा नेता नाही. अशोक चव्हाण मोठे नेते आहेत. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. नांदेड जिल्ह्यातील एकंदरीत वातावरण पाहून आता आपण काँग्रेससोबत राहू नये, अशी त्यांची मानसिकता असेल, असे मला वाटते.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles