Monday, May 20, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडहातगाडी,टपरीधाकाचे महापालिकेसमोर आंदोलन

हातगाडी,टपरीधाकाचे महापालिकेसमोर आंदोलन

बोगस सर्वेक्षण रद्द करा, हॉकर झोनची अंमलबजावणी करा.

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:दि.३
– पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून पथविक्रेता कायद्याची अंमलबजावणी करावी व पैसे देऊन बोगस फोटो काढून केलेले फेरीवाला सर्वेक्षण रद्द करावे या व इतर मागण्यासाठी नॅशनल हॉकर फेडरेशन, कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे पिंपरी चिंचवड महापालिका भवनासमोर शहरातील पथारी, हातगाडी, टपरीधारकांनी आज तीव्र आंदोलन केले. यामध्ये सांगवी, पिंपरी,भोसरी, चिंचवड,डांगेचौक, चिखली, नाशिकफाटा, दापोडी,रावेत,निगडी आकुर्डी आदी परिसरातील विक्रेत्यांनी, सदस्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.

यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते, प्रहार संघटनेचे राजेंद्र वाघचौरे,प्रदेश संघटक अनिल बारवकर, कार्याध्यक्ष इरफान चौधरी,कार्याध्यक्ष राजू बिराजदार,बालाजी लोखंडे, किरण साडेकर, अंबादास जावळे, अमोल भंडारी, वृषाली पाटणे,फरीद शेख, नंदा तेलगोटे,प्रशांत नवगिरे, सलीम डांगे, सुनंदा चिखले,अरुणा सुतार,संभाजी वाघमारे, यासीन शेख,प्रदीप मुंडे, सुरेश देडे,विठ्ठल कड, शेषनारायण खंकाळ, नितीन सुरवसे, इरफान मुल्ला,कृष्णा सिंग, सुखदेव कांबळे,दत्ता जाधव,महादेव स्वामी
आदी मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.

यावेळी नखाते म्हणाले की पिंपरी चिंचवड मनपाकडून चुकीच्या संस्थेला काम दिल्यामुळे व क्षत्रिय अधिकारी व अतिरिक्त आयुक्त यांचे नियंत्रण व लक्ष नसल्यामुळे ज्यांचा व्यवसाय नाही अशा बोगस लोकांकडून पैसे घेऊन हातगाडीवर, स्टॉलवर उभा करून बोगस फोटो काढून त्यांचे बोगस सर्वेक्षण करण्यात आलेले आहे, त्यांची नावे आली आहेत जे प्रामाणिक आहेत त्यांची नावे आली नाहीत, कागदपत्रे देऊनही अपूर्ण यादीत मुद्दाम नावे घेतली आहेत. म्हणजे त्यांचेकडून पुन्हा पैसे उकळण्याचा प्रकार होणार आहे. बोगसमुळे संख्या१८६०० वर गेलेली आहे. बोगस त्वरित रद्द करण्यात यावे.

सर्वेक्षण यादीमध्ये सावळा गोंधळ असून १७४३७ वरून १८६०० कसे झाले हा प्रश्न फेरीवाले विचारत आहेत.मनमानी पद्धतीने सर्वेक्षण करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड शहरांमध्ये स्मार्ट सिटी मध्ये फेरीवाल्यांना स्थान असावे,शहरात होत असलेले अतिक्रमण कारवाई थांबावी,पे अँड पार्किंग प्रमाणे पे अँड हॉकिंग सुरू करावे ,हॉकर झोनची निर्मिती करण्यात यावी, फेरीवाला कायद्याची अंमलबजावणी करावी, निर्माण केलेल्या हॉकर झोनमध्ये सुविधा देण्यात यावी, अशा विविध मागण्यावर मागण्या घेऊन पोलीस प्रशासनासह शिष्टमंडळाने सहाय्यक आयुक्त प्रशांत जोशी यांच्याशी चर्चा केली यावर लवकरच आयुक्त शेखर सिंह आणि अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांच्याबरोबर या आठवड्यात बैठक घेण्याचे आणि मागण्यावर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय