Friday, May 3, 2024
Homeजिल्हाशिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या दीर्घ लढ्याला यश, शासनाने आश्वासित प्रगती योजना केली पूर्ववत लागू

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या दीर्घ लढ्याला यश, शासनाने आश्वासित प्रगती योजना केली पूर्ववत लागू

बार्शी : विद्यापीठ व संलग्न महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी यांना दिनांक 31 मे 2023 रोजी सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना पूर्ववत चालू करण्याचे आदेश शासनाने निर्गमित केले आहेत. त्यामुळे शिक्षकेतरांची वसुली थांबेल व वेतन वाढ होईल यामुळे शिक्षकेतर कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

अधिक माहिती अशी की, सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना 15 फेब्रुवारी 2011 व 28 डिसेंबर 2010 च्या शासन आदेशाप्रमाणे योजना चालू झाली होती परंतु वित्त विभागाची परवानगी न घेता शासन आदेश लागू केल्याने दिनांक 7 डिसेंबर 2018 व 16 फेब्रुवारी 2019 च्या शासन आदेशाने ही योजना रद्द करण्यात आली होती. यानंतर राज्यातील सर्व संघटना स्वर्गीय रमेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सेवक संयुक्त कृती समिती च्या माध्यमातून एकत्र आल्या व त्यांनी काम बंद, अवसर बंद, लक्षणीक संप, बेमुदत संप, निदर्शनेे, मोर्चे, मेल पाठवणे आंदोलन, पोस्ट आंदोलन, नागपूर हिवाळी अधिवेशनावर मोर्चा अशी अंदोलने केली यामध्ये आयटक संघटना आपल्या ताकतीने सहभागी झाली, जवळजवळ पाच वर्षाच्या संघर्षानंतर हे यश प्राप्त झाले आहे.

हा शासन आदेश निर्गमित होण्यासाठी आयटक शिक्षकेतर संघटनेचे मार्गदर्शक उमरगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी अत्यंत महत्त्वाचे प्रयत्न केले त्यामुळे त्यांचे तसेच वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे शिक्षकेतरांच्या वतीने धन्यवाद व्यक्त करण्यात आले आहेत.

हे यश प्राप्त करण्यासाठी राज्य कृती समिती चे संघटक, अजयजी देशमुख, व कृती समीती सर्व पदाधिकारी संघटनेचे अध्यक्ष कॉ. तानाजी ठोंबरे, आयटक राज्य नेते कॉ.अरुण रेणके, कॉ. ए.बी. कुलकर्णी, कॉ. डॉ. प्रविण मस्तुद, संदिप ढवळे, उमेश मदने, आरती रावळे, लता काटे, गणेश करंजकर, विलास कोठाळे, उदयसिंह देशमूख, भारत जाधव, सुधीर सेवकर, अशोक पवार, भीमा मस्के आदींनी प्रयत्न केले.

हे ही वाचा :

महिला खेळाडूंच्या लैंगिक शोषणाच्या आरोपावरून भाजपाच्या महिला खासदाराचा मोदी सरकारला घराचा आहेर

महापुरूषांविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘या’ वेबसाईटवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

ब्रेकिंग : उद्धव ठाकरे यांना दुसरा मोठा धक्का, हजारो कार्यकर्ते शिंदे गटात

डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनची व्याप्ती वाढविली

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : राज्य सरकार ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ राबविणार; मिळणार ‘इतके’ पैसे

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! केवळ एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय