Tuesday, May 7, 2024
Homeराजकारणराज ठाकरे यांनी कुस्तीपटूंच्या न्यायासाठी थेट मोदींना लिहीले पत्र, काय म्हणाले पहा...

राज ठाकरे यांनी कुस्तीपटूंच्या न्यायासाठी थेट मोदींना लिहीले पत्र, काय म्हणाले पहा !

UWW on Wrestlers Protest : कुस्तीपटूंचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह ( Brij Bhushan Sharan Singh) यांच्यावर कारवाई करा, या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून कुस्तीपटूंचं आंदोलन सुरु आहे. परंतु अद्यापपर्यंत केंद्र सरकारने आंदोलनाची दखल घेतली नाही. संतप्त कुस्तीपटूंनी नव्या संसद भवनाच्या उद्घाटन प्रसंगी निषेध आंदोलन केले. पोलिसांनी कुस्तीपटूंना ताब्यात घेत अत्यंत हिन वागणूक दिल्याचे समोर आले. व केंद्र सरकारला टीकेला सामोरे जावे लागले. (Wrestling Federation of India)

आता, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहित कुस्तीपटूंना न्याय देण्याची केली आहे. राज ठाकरे यांनी याबाबत ट्विट केले आहे.

ट्विटरमध्ये राज ठाकरे म्हणतात, “सन्मा. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, ज्यांचा गौरव आपण ‘देश की बेटियाँ’ असा करत आलो, ज्यांच्या श्रमातून आपल्या देशाला कुस्तीच्या खेळात अनेक पदकं बघायला मिळाली असे कुस्तीपटू न्यायासाठी आक्रोश करत असताना २८ मे ला ज्या पद्धतीने त्यांची जशी फरफट झाली तशी फरफट पुन्हा होऊ नये. तसंच आपण स्वतः ह्या विषयांत लक्ष घालून त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि सन्मानजनक तोडगा काढावा व भारतीय क्रीडाजगताला आश्वस्त करावं, ही नम्र विनंती.

मोदी यांना लिहिलेल्या पत्रात राज ठाकरे म्हणतात, ” या प्रकरणात तोडगा काढावा. या लढाईत कुणाच्याही बाहुबलाचं दडपण येणार नाही, याची खात्री सरकारकडून हवी असे कुस्तीगीरांचे म्हणणे आहे ती हमी सरकारने द्यावी.

२६/११ च्या वेळी जी सहृदयता दाखवली तशी कुस्तीगीरांच्या बाबतही दाखवावी असे आवाहन त्यांनी केले आहे. २८ मे रोजी जी फरफट झाली तशी फरफट होणार नाही अशी अपेक्षा आहे. आपण त्यात लक्ष घालावं व तोडगा काढावा अशी विनंतीही शेवटी राज ठाकरे यानी केली आहे.

हे ही वाचा :

महिला खेळाडूंच्या लैंगिक शोषणाच्या आरोपावरून भाजपाच्या महिला खासदाराचा मोदी सरकारला घराचा आहेर

महापुरूषांविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘या’ वेबसाईटवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

ब्रेकिंग : उद्धव ठाकरे यांना दुसरा मोठा धक्का, हजारो कार्यकर्ते शिंदे गटात

डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनची व्याप्ती वाढविली

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : राज्य सरकार ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ राबविणार; मिळणार ‘इतके’ पैसे

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! केवळ एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय