Saturday, April 20, 2024
Homeराष्ट्रीयकुस्तीपटूंच्या समर्थनार्थ खेळाडूही मैदानात; ट्विट करत म्हणाले !

कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ खेळाडूही मैदानात; ट्विट करत म्हणाले !

Wrestlers Protest: भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचे आरोप करत कुस्तीपटू गेले अनेक दिवस आंदोलन करत आहेत. परंतु अद्यापपर्यंत केंद्र सरकारने आंदोलनाची दखल घेतली नाही. आता सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्राबरोबरच क्रिडा क्षेत्रातून या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे.

माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे आणि इरफान पठाण यांनी त्यांच्या समर्थनार्थ ट्विट केले आहे. या अगोदर अनेकांनी समर्थन दिले आहे.

अनिल कुंबळे यांनी केलेल्या ट्विट मध्ये ते म्हणतात, “28 मे रोजी आमच्या कुस्तीपटूंशी झालेल्या गैरवर्तनाबद्दल ऐकून खूप वाईट वाटले. योग्य चर्चेतून कोणतीही गोष्ट सोडवली जाऊ शकते. लवकरात लवकर तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे.”

तसेच इरफान पठाण यांनी ट्वीट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या. इरफान म्हणाला की, ”आमच्या खेळाडूंचे हे दृश्य पाहून मला खूप वाईट वाटते. या प्रकरणावर लवकरात लवकर तोडगा निघावा.”

हे ही वाचा :

महिला खेळाडूंच्या लैंगिक शोषणाच्या आरोपावरून भाजपाच्या महिला खासदाराचा मोदी सरकारला घराचा आहेर

महापुरूषांविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘या’ वेबसाईटवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

ब्रेकिंग : उद्धव ठाकरे यांना दुसरा मोठा धक्का, हजारो कार्यकर्ते शिंदे गटात

डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनची व्याप्ती वाढविली

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : राज्य सरकार ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ राबविणार; मिळणार ‘इतके’ पैसे

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! केवळ एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय