Monday, July 8, 2024
Homeजिल्हाScholarship : संस्कार इंग्लिश मीडियम स्कूल चे विद्यार्थी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत...

Scholarship : संस्कार इंग्लिश मीडियम स्कूल चे विद्यार्थी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत अव्वल

पिरंगूट / दिपाली पवळे : मुळशी तालुक्यात इयत्ता आठवी स्कॉलरशिप परीक्षेत प्रथम तीन विद्यार्थी संस्कार स्कूलचे आले आहेत. गेल्या शैक्षणिक वर्षात झालेल्या स्कॉलरशिप (Scholarship) परीक्षेमध्ये इयत्ता आठवीचे दोन विद्यार्थी “ग्रामीण सर्वसाधारण” तालुकास्तरीय गुणवत्ता यादीमध्ये पात्र झाले असून प्रथम क्रमांक तनुश्री बाळकृष्ण थोरवे व तृतीय क्रमांक प्रथमेश प्रशांत गरुड तसेच तितकेच गुण मिळवून वरद रवींद्र सुतार यानेही यश संपादन केलेले आहे.

यावर्षी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (Scholarship) परीक्षेचा निकाल फक्त 15.23% लागला आहे. यामध्ये इंग्रजी माध्यमाचे मुळशी तालुक्यात नऊ विद्यार्थी पात्र झाले असून त्यापैकी सहा विद्यार्थी हे संस्कार इंग्लिश मीडियम स्कूलचे आहेत. तनुश्री बाळकृष्ण थोरवे, प्रथमेश प्रशांत गरुड, वरद रवींद्र सुतार, स्वराली गजाननराव देशमुख, प्रियांका युवराज गुंड, व मैथिली निलेश चांदेरे शाळेला नक्कीच या विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सार्थ अभिमान आहे.” अशा प्रकारच्या स्पर्धा परीक्षेमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे व चांगल्या प्रकारे यश संपादन करावे” असे शाळेच्या मुख्याध्यापिका साठे मॅडम विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या.

सर्व विद्यार्थ्यांचे शाळेतर्फे अभिनंदन करण्यात आले. सलग तीन वर्षापासून गुणवतयादीमध्ये येण्याची परंपरा यावर्षीही संस्कार स्कूलने अबाधित ठेवली आहे. (Scholarship)

गुणवत्ता यादीमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालकांचे त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक देशमुख सर, ऐश्वर्या लांबोरे, सुप्रिया जाधव, प्रतिभा शेगेदार, दिपाली भावसार, सत्यशीला माने, दिपाली आंबेकर, पल्लवी उंडेगावकर यांचे सर्व परिसरातून कौतुक होत आहे. या सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे शाळेच्या वतीने विशेष कौतुक शाळेचे चेअरमन शिवाजी साठे यांनी केले.

Scholarship

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

AIASL मार्फत विविध पदांच्या 3256 जागांसाठी मेगा भरती

ब्रेकिंग : महाराष्ट्रातील झिका विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक नियमावली जाहीर

धक्कादायक! अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीने कॉलेजच्या टॉयलेटमध्ये दिला बाळाला जन्म

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अमली पदार्थांचे प्रकरण विधानपरिषदेत

ब्रेकिंग : वैद्यकीय अधिकारी संवर्गाच्या पदभरतीसाठी महत्वाची बातमी

सर्वात मोठी बातमी : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत मोठे बदल, तारिखही वाढविली

धक्कादायक : सत्संग कार्यक्रमातील चेंगराचेंगरीत 87 जणांचा मृत्यू, देशभरात खळबळ

ब्रेकिंग : दूध उत्पादकांसंदर्भात महत्वाची बातमी, सरकारने घेतला महत्वाचा निर्णय

ब्रेकिंग : आदिवासी विकास विभागातील भरती संदर्भात मंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

स्वस्त धान्य दुकानाचा परवानाचा हवाय ? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय