Wednesday, November 6, 2024
Homeताज्या बातम्याधक्कादायक! अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीने कॉलेजच्या टॉयलेटमध्ये दिला बाळाला जन्म

धक्कादायक! अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीने कॉलेजच्या टॉयलेटमध्ये दिला बाळाला जन्म

Karnataka : कर्नाटकातील कोलार जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. कोलार येथे एका खासगी प्री-विद्यापीठ महाविद्यालयात शिकणाऱ्या 17 वर्षीय मुलीने शाळेच्या आवारातच मुलाला जन्म दिला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी घडलेल्या या घटनेत इयत्ता 11वीत शिकणाऱ्या मुलीने महिलांच्या शौचालयात मुलाला जन्म दिला. मुलगी आणि बाळाला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (Karnataka)

या घटनेनंतर कोलार महिला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मुलगी आणि आरोपी मुलगा गेल्या दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, मुलीच्या गर्भधारणेची माहिती तिच्या कुटुंबाला कशी मिळाली नाही आणि त्यांनी ही माहिती का लपवली हे अद्यापही गूढ आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी आरोपीविरुद्ध पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू केली आहे.

दरम्यान, समाजातील अशा घटना रोखण्यासाठी आणि युवक-युवतींना योग्य मार्गदर्शन देण्यासाठी अधिकाधिक जनजागृतीची गरज असल्याचे बोलले जात आहे.

(Karnataka)

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

सर्वात मोठी बातमी : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत मोठे बदल, तारिखही वाढविली

धक्कादायक : सत्संग कार्यक्रमातील चेंगराचेंगरीत 87 जणांचा मृत्यू, देशभरात खळबळ

ब्रेकिंग : दूध उत्पादकांसंदर्भात महत्वाची बातमी, सरकारने घेतला महत्वाचा निर्णय

ब्रेकिंग : आदिवासी विकास विभागातील भरती संदर्भात मंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

स्वस्त धान्य दुकानाचा परवानाचा हवाय ? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची

PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 2700 जागांसाठी भरती

ब्रेकिंग : राज्य सरकारचा मोठा निर्णय ; राज्यात लवकरच पाच फिरत्या अन्न तपासणी प्रयोगशाळा

संबंधित लेख

लोकप्रिय