Saturday, October 5, 2024
Homeजुन्नरJunnar : आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत मोफत बालआरोग्य चिकित्सा शिबीर व मार्गदर्शन

Junnar : आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत मोफत बालआरोग्य चिकित्सा शिबीर व मार्गदर्शन

जुन्नर / आनंद कांबळे : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कुमशेत (ता.जुन्नर) येथे आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत या आठवड्यातील डॉक्टर दिनाचे औचित्य साधून डॉक्टर आपल्या भेटीला उपक्रम निमित्ताने व कै.आर्किटेक्चर चैतन्य धनंजय डुंबरे यांच्या स्मरणार्थ चाईल्ड केअर फाउंडेशन जुन्नर आयोजित मोफत बाल आरोग्य चिकित्सा शिबीर व मार्गदर्शन घेण्यात आले. (junnar)

डॉ.सचिन डुंबरे बालरोगतज्ञ यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छता, सकस पौष्टिक आहार, चांगल्या सवयी, खेळाचे महत्त्व संदर्भात मार्गदर्शन केले. लायन्स क्लब शिवनेरी जुन्नरचे अध्यक्ष डॉ.भास्कर डुंबरे, चाईल्ड केअर फाउंडेशन सदस्य धनंजय डुंबरे, साधना डुंबरे, रेवा डुंबरे, ग्रीष्मा डुंबरे, परिवार उपस्थित होता. (junnar)

आर्किटेक्चर कै.चैतन्य धनंजय डुंबरे यांच्या स्मरणार्थ शाळेतील विद्यार्थ्यांना चित्रकला वही, शैक्षणिक साहित्य, पुस्तके,वजन उंची तक्ता, अंगणवाडी व शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना ढोकळा व चाॅकलेट देऊन डॉक्टर आपल्या भेटीला हा उपक्रम बालचमुंसमवेत उत्साहात संपन्न झाला. (junnar)

या कार्यक्रमासाठी कुमशेत गावचे सरपंच रविंद्र डोके, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष असलम इनामदार, सदस्य चेतन भगत, सदस्य गणेश डोके, अंगणवाडी ताई सुलोचना डोके, संजीवनी नाईकवाडी, स्वयंपाकी वैशाली डोके, औटी, यशवंत घोडे, श्याम लोलापोड, आणि विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मेंदू खाणाऱ्या अमिबाने 14 वर्षांच्या मुलाचा घेतला जीव

रिलसाठी स्टंट करताना दुचाकीवरून तरुणाचा भीषण अपघात, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

जगातील पहिली CNG बाईक प्रदूषणमुक्त भारत ध्येय साध्य करेल – नितीन गडकरी

नाणेघाट : इतिहासाची आणि नैसर्गिक सौंदर्याची संगमभूमी

मोठी भरती : बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत भरती; पगार 64480 पर्यंत

ब्रेकिंग : मुख्याध्यापक नियुक्तीसाठी पटसंख्येचा निकष बदलणार ?

गावठी दारू तयार करणाऱ्या १० हातभट्ट्यांवर छापा; २ लाख १७ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त

AIASL मार्फत विविध पदांच्या 3256 जागांसाठी मेगा भरती

ब्रेकिंग : महाराष्ट्रातील झिका विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक नियमावली जाहीर

धक्कादायक! अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीने कॉलेजच्या टॉयलेटमध्ये दिला बाळाला जन्म

संबंधित लेख

लोकप्रिय