Thursday, October 10, 2024
Homeताज्या बातम्याTribal Bharti : आदिवासी विकास विभागातील भरती संदर्भात मंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

Tribal Bharti : आदिवासी विकास विभागातील भरती संदर्भात मंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

मुंबई, दि. ०२ : आदिवासी विकास विभागातील भरती प्रक्रियेत (Tribal Bharti) आकृतीबंधाची पूर्णपणे अंमलबजावणी केली जात असून भरती प्रक्रिया आकृतीबंधानुसारच होत असल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

याबाबत सदस्य शिरीषकुमार नाईक यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य विनोद निकोले, सुनील भुसारा, राजेश पाटील, डॉ. देवराव होळी, रोहित पवार यांनीही सहभाग घेतला.

मंत्री डॉ. गावित म्हणाले की, आदिवासी विकास विभागाच्या (Tribal Bharti) अधिनस्थ असलेल्या क्षेत्रीय कार्यालयांचा सुधारित आकृतीबंध निश्चित करण्यात आला असून त्यानुसार १४,३५९ इतकी नियमित पदे निर्माण करण्यात आली आहेत. तसेच ६,०८८ पदांच्या सेवा बाह्यस्रोताद्वारे भरण्यात आले आहेत. तसेच गट-‘अ’, गट-‘ब’, व गट-‘क’ (लिपिक वर्गीय पदे) मधील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदे भरण्याबाबतचे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगास सादर करण्यात आले आहे. (Tribal Bharti)

विभागातील गट-‘अ’, गट-‘ब’ पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त पदे भरण्यात आलेली आहे. तर गट-‘क’ मधील पदोन्नतीची पदे भरण्याबाबतची कार्यवाही संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्याकडून करण्यात येत आहे. प्रत्येक आश्रमशाळेमध्ये एक नर्स याप्रमाणे एकूण ४९९ नर्स बाह्यस्रोताद्वारे घेण्याचे धोरण निश्चित करण्यात आले असून नर्स पदे बाह्यस्त्रोतांद्वारे उपलब्ध करुन घेण्यासाठी जेम पोर्टलवर (GeM Portal) निविदा प्रक्रिया राबविण्याबाबत कार्यवाही सुरु आहे.

रोजंदारी पद्धतीने कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शासनाच्या सेवेत नियमित करण्याबाबत उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार १० वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेले रोजंदारी कर्मचारी यांना शासन सेवेत नियमित करण्यात आले असल्याचेही मंत्री डॉ. गावित यांनी सांगितले.

Tribal Bharti

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

स्वस्त धान्य दुकानाचा परवानाचा हवाय ? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची

PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 2700 जागांसाठी भरती

ब्रेकिंग : राज्य सरकारचा मोठा निर्णय ; राज्यात लवकरच पाच फिरत्या अन्न तपासणी प्रयोगशाळा

ब्रेकिंग : पर्यटकांसाठी महत्वाची बातमी ; पर्यटनस्थळी नवीन सुरक्षा नियम लागू !

शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू; आजच करा अर्ज!

मोठी बातमी : विधान परिषदेच्या पाच जागांसाठी भाजपकडून उमेदवारांची घोषणा

ब्रेकिंग : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ; पीक विमा योजनेच्या अर्जासाठी जास्त पैसे मागितल्यास तक्रार करा!

ब्रेकिंग : मुंबई शिक्षक मतदारसंघात जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर ४ हजार ८३ मते मिळवून विजयी

मोठी बातमी : नाशिक शिक्षक मतदारसंघात किशोर दराडे विजयी

नागपूरमधील दीक्षाभूमी अंडरग्राऊण्ड पार्किंगच्या विरोधात जोरदार आंदोलन, उपमुख्यमंत्र्याकडून कामाला स्थगिती

मोठी बातमी : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेच्या संदर्भात मंत्र्यांनी दिले महत्वाचे निर्देश

धक्कादायक : लिफ्टमध्ये कुत्र्याला वॉकरने मारहाण; सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना कैद

संबंधित लेख

लोकप्रिय