Sunday, May 4, 2025
---Advertisement---
---Advertisement---

वैद्यकीय अधिकारी संवर्गाच्या पदभरतीसाठी महत्वाची बातमी

मुंबई, दि. ३ : राज्यातील सर्व प्रकारच्या महानगरपालिकांच्या वैद्यकीय अधिकारी संवर्गातील रिक्त पदे भरतीबाबत (Medical Officer Cadre Recruitment) शासन सकारात्मक असून लवकरच धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेंतर्गत वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते.

---Advertisement---

सदस्य विक्रम काळे यांनी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांबाबत प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना मंत्री सामंत म्हणाले की, “छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत वैद्यकीय अधिकारी संवर्गाची ४१ पदे मंजूर आहेत, त्यापैकी २९ पदे भरलेली आहेत. याअंतर्गत सेवा, सेवासातत्याची सुरक्षा, ठराविक वेतन, सेवा समाप्ती तसेच इतर नियमांची अंमलबजावणी केली जाते.” (Medical Officer Cadre Recruitment)

महानगरपालिकेकडून सन २०२३ व २०२४ मध्ये राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत वैद्यकीय अधिकारी पद भरतीची जाहिरात तीन वेळा प्रसिद्ध करण्यात आली होती. यामध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची निवड करून ४१ जागांवर नियुक्ती दिली गेली आहे. तथापि, सार्वजनिक आरोग्य विभाग/लोकसेवा आयोग यांच्यामार्फत निवड, पदव्युत्तर प्रवेश परीक्षेची तयारी इत्यादी वैयक्तिक कारणांमुळे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत नियुक्ती केलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्यामुळे काही पदे रिक्त झाली आहेत.

---Advertisement---

सदर रिक्त पदे भरण्याची कार्यवाही महानगरपालिकेकडून पुन्हा करण्यात येत आहे. राज्यातील ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’ अशा सर्व महानगरपालिकांमध्ये वैद्यकीय अधिकारी यांची पदे भरणे तसेच त्यांच्या मानधनात वाढ करण्याबाबत शासन सकारात्मक आहे. याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याचा शासनाचा विचार आहे, लवकरच वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मानधन वाढविण्याबाबतही सकारात्मक निर्णय लवकरच घेतला जाईल, असे मंत्री सामंत यांनी यावेळी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य कपिल पाटील, अमोल मिटकरी, जयंत पाटील यांनी सहभाग घेतला.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

सर्वात मोठी बातमी : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत मोठे बदल, तारिखही वाढविली

धक्कादायक : सत्संग कार्यक्रमातील चेंगराचेंगरीत 87 जणांचा मृत्यू, देशभरात खळबळ

ब्रेकिंग : दूध उत्पादकांसंदर्भात महत्वाची बातमी, सरकारने घेतला महत्वाचा निर्णय

ब्रेकिंग : आदिवासी विकास विभागातील भरती संदर्भात मंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

स्वस्त धान्य दुकानाचा परवानाचा हवाय ? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची

PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 2700 जागांसाठी भरती

ब्रेकिंग : राज्य सरकारचा मोठा निर्णय ; राज्यात लवकरच पाच फिरत्या अन्न तपासणी प्रयोगशाळा

ब्रेकिंग : पर्यटकांसाठी महत्वाची बातमी ; पर्यटनस्थळी नवीन सुरक्षा नियम लागू !

शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू; आजच करा अर्ज!

---Advertisement---

मोठी बातमी : विधान परिषदेच्या पाच जागांसाठी भाजपकडून उमेदवारांची घोषणा

ब्रेकिंग : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ; पीक विमा योजनेच्या अर्जासाठी जास्त पैसे मागितल्यास तक्रार करा!

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles