Sunday, May 19, 2024
Homeजिल्हाशेतमजूर एकजूट बळकट करा – कॉ. राजू देसले

शेतमजूर एकजूट बळकट करा – कॉ. राजू देसले

नाशिक : शेतमजुरांचे प्रश्न तीव्र होत आहेत, महागाई, बेरोजगारी वाढत आहे, केंद्र व राज्य सरकार रेशन वेवस्था मोडकळीस आणण्यासाठी प्रयत्न करत आहे, रोजगार हमी योजना चा प्रभावी अंमलबजावणी व्हावी, शेतकऱ्याच्या बांधावरील कामाचा समावेश मनरेगा मध्ये करावा व मजुरांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी शेतमजुर एकजूट करुन तीव्र लढा उभारावा असे आवाहन लाल बावटा शेतमजूर युनियन नाशिक जिल्हा अधिवेशनात भारतीय कम्युनिस्ट पक्ष राज्य सहसचिव कॉ.राजू देसले यांनी उद्घाटन प्रसंगी मनोगत व्यक्त करताना आयटक कामगार केंद्र नाशिक येथे केले. Strengthen farm labor unity – Com. Raju Desale

नाशिक जिल्ह्या राज्य लाल बावटा शेतमजूर युनियन अधिवेशन भारतीय कम्युनिस्ट पक्ष राज्य सहसचिव कॉ राजु देसले यांनी विविध शेतमजूरांच्या समस्यांवर मार्गदर्शन केले. 

भाकपाचे जिल्हा सचिव कॉम्रेड महादेव खुडे हे अध्यक्षस्थानी होते. प्रसंगी कॉ.मनोहर पगारे, कॉ.सुकदेव केदारे, कॉ. रमेश पवार, किसान सभेचे कॉ नामदेवराव बोराडे, कॉ भिमा पाटील, अनिल पठारे,योगिता भाबड, ऊषा भालेराव, शिवाजी पगारे,रंजना बाई जाधव, सीमा वाघ, जयवांताबाई नवरे आदी सदस्य जिल्हातील सटाणा,सिन्नर, चांदवड,नांदगाव तालुक्यातून उपस्थित होते. संभाजीनगर येथे ६, ७, ८ ऑक्टोबर राज्य अधिवेशन साठी ९ प्रतिनिधी निवड करण्यात आली.

शेतमजूर साठी सामाजिक सुरक्षा लागू करा. त्यासाठी सामाजिक सुरक्षा मंडळ स्थापन करा. मनरेगा मध्ये मजुरांना मजुरी ६००रू. प्रतीदीन दया, वर्ष भरात मानसी ३००दिवस काम द्या.रेशन वेवस्था मजबुत करा. रोख सबसिडी नको. धान्य दया., महागाई कमी करा. कसत असलेल्या गायरान जमीन, वन जमीन नावावर करा, आदि ठराव संमत करण्यात आले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय