Wednesday, May 22, 2024
Homeजिल्हाDYFI : महात्मा फुले व डॉ.आंबेडकर नगर डीवायएफआयचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

DYFI : महात्मा फुले व डॉ.आंबेडकर नगर डीवायएफआयचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

पूर्णा : महात्मा फुले नगर व डॉ.आंबेडकर नगर या दोन्ही नगरांतील तसेच शहरातील इतर ठिकाणच्या विविध समस्यांना घेऊन महात्मा फुले व डॉ.आंबेडकर नगर DYFI समितीकडून आज नगर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात पुढील मागण्यांचा समावेश आहे.

महात्मा फुले नगर व डॉ.आंबेडकर नगर येथील कचऱ्याची सातत्याने विल्हेवाट लावा व नाल्यांची नियमितपणे सफाई करा, दोन्ही नगरांत व पूर्णेत इतर ठिकाणी सुद्धा नवीन विद्युत खांब उभारले आहेत त्यावर ताबडतोब विद्युत दिवे बसवा तसेच ज्या ठिकाणी विद्युत खांब उभारले नाहीत तिथे उभारा व त्यावरही विद्युत दिवे बसवा, अजीज नगर, मस्तानपुरा, भिम नगर, अण्णाभाऊ साठे नगर येथील नाल्यांची स्वछता नियमितपणे करा व कचऱ्याची सातत्याने विल्हेवाट लावा, शहरात विविध ठिकाणी पाणी उपलब्ध करा व उपलब्ध असलेल्या पाण्याचे नीट नियोजन करा, विभागनिहाय अनिश्चित वेळांमुळे वाया जाणारे पाणी वाचवा आणि विभागनिहाय गरजेनुसार आणि संबंधित ठिकाणच्या चढ-उतारानुसार वेळा निश्चिती करा, शहरातील जुन्या झालेल्या पाईपलाईन्समुळे ठिकठिकाणी पाणी वाया जात असल्यामुळे त्यावर दीर्घकालीन उपाययोजना करा, शहरासाठी मंजूर झालेल्या फिल्टरचे काम ताबडतोब सुरु करा व पिण्यायोग्य पाणी उपलब्ध करून द्या पाण्याच्या सर्व समस्या दूर करून कधी काही कारणास्तव पाण्याची समस्या निर्माण होत असेल तर नागरिकांना नियमितपणे दवंडीद्वारे (announcement) कळवित जावे आदी मागण्या करण्यात आल्या.

निवेदनावर जिल्हासचिव नसीर शेख, महात्मा फुले व डॉ.आंबेडकर नगर DYFI समितीचे अध्यक्ष अमोल पट्टेकर, सचिव सुबोध खंदारे, सहसचिव वैभव जाधव, सचिवमंडळ सदस्य विजय कांबळे, सदस्य तेजस खंदारे, शुभम गायकवाड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

whatsapp link

हे ही वाचा

धक्कादायक : बाथरूममध्ये गेला अन् त्याने प्रायव्हेट पार्टला टोचलं इंजेक्शन; पुढे होत्याचे नव्हते झाले

Sky baby : महिलेची विमानात प्रसूती; पायलट बनला डॉक्टर, बाळाचा जन्म आकाशात

ब्रेकिंग : धुळ्यातील 200 प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा

सावधान! “या” जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊसाचा अंदाज

मोठी बातमी : इलेक्टोरल बॉन्डची माहिती जाहीर भाजप मालामाल, हा मोठा घोटाळा..

मोठी बातमी : केंद्र सरकारकडून 18 OTT प्लॅटफॉर्मवर बंदची कारवाई, ‘ही’ आहे लिस्ट

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय