चाकण : २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत खेड तालुक्याचा आमदार आपचाच असेल असा निर्धार आप प्रदेश युवा अध्यक्ष मयूर दौंडकर यांनी मेळाव्यात व्यक्त केला. बुधवार दि.२० सप्टेंबर 2023 रोजी खेड तालुका आप पक्षाच्या जनशक्ती आढावाअभियान अंतर्गत कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा ऐश्वर्या बॅकवेट हॉल चाकण येथे संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. Spontaneous response to Khed Taluka Aam Aadmi Party worker meeting!
यावेळी संदीप शिंदे, दत्ता ढेरंगे, भरत पवळे, दत्ता टाकळकर, पंढरीनाथ जरे, नितीन सैंद, संदीप पाटील, विठ्ठल परदेशी, अरुण पवार, बाळासाहेब माशेरे यांनी तालुक्यातील सध्याच्या राजकारणाची सद्यस्थिती, सामान्यांच्या अपेक्षा, व पक्षाच्या वाटचालीबद्दल निश्चित दिशा याबद्दल आपली मनोगत व्यक्त केली.
बैठकीचे अध्यक्ष आप प्रदेश युवा अध्यक्ष मयूर दौंडकर याप्रसंगी बोलताना म्हणाले, “खेड तालुक्यातील सामान्य जनतेला सामान्यातील सामान्यांचेलोकहित जपणारा आमदार हवा आहे. सामान्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देणारा व त्याला न्याय देणाऱ्या सक्षम नेतृत्वाची तालुक्याला गरज आहे. ही गरज आम आदमी पक्षाच्या वतीने पूर्ण होऊन २०२४ च्या निवडणुकीत खेड विधानसभेचा आमदार आपचाच असेल!”
आपच्या झाडूने तालुक्यातील गलिच्छ राजकारण साफ करावयाचे आहे. शेतकरी, मजूर, दलित, आदिवासी, महिला, यासारख्या सामान्यांच्या प्रश्नाला न्याय देणारा सामान्यांचा आमदार तालुक्यात असण्याची गरज आहे असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. व त्यासाठी आमचे कार्यकर्ते अहो रात्र झटतील आणि निश्चितपणे तालुक्यात परिवर्तन घडवून आणतील. देशपातळीवरील आपची सद्य:स्थिती दिल्ली, पंजाब, आपने मिळवलेली सत्ता, गुजरात विधानसभा निवडणुकीत आप पक्षाने दिलेल्या प्रचंड लढा, व राष्ट्रीय पक्ष म्हणून मिळालेले मान्यता, पक्षाची ध्येय धोरणे याबाबत सविस्तर माहिती विशद केली. खेड तालुका येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था व विधानसभा, या सर्व निवडणुकाआपच्या वतीने सर्वसामान्यांना बरोबर घेऊन पूर्ण ताकतीने लढण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. कार्यकर्त्यांना प्रेरणा देऊन आत्मविश्वास निर्माण करून कामाला लागण्याचा सल्ला त्यांनी दिला.
खेड तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा निवडणूक लढवण्या बाबतचा निश्चय व्यक्त करण्यात आला. आप खेड तालुका कार्यकारणी, चाकण, आळंदी, खेड, नगरपालिका, पंचायत समिती जिल्हा परिषद गटनिहाय, गाव निहाय समित्यांच्या निवडीचा निश्चय केला. या बैठकीत अनेक कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला.
महिला, युवा, उद्योग, व्यापार वाहतूक, शेतकरी आघाड्यांच्या प्रमुखांचे नेमकी बाबत निर्धार, पक्ष बांधणी सभासदांची नोंदणी वर भर देण्याचा निर्धार, विभाग वाईज, शहरवाईज, मिळावे घेण्याचा केला निर्धार, लवकरच आप पक्षाच्या राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांना बोलून “विराट सभा” खेड तालुक्यात घेण्याबाबत निर्धार देखील करण्यात आला.
तालुक्यातील स्थानिक प्रश्न विचारात घेऊन जनसामान्यांच्या हक्कासाठी लढा/ आंदोलने उभी करून न्याय देण्याचा निश्चय व्यक्त केला. घर टू घर आम आदमी पक्षाचे विचार पोहोचवण्यावर भर देण्यात येणार आहे. संपूर्ण तालुक्यात आपच्या विचारांच्या प्रसारासाठी व तालुक्याचे प्रश्न जाणून घेण्यासाठी मोटर सायकल रॅली आणि”जनशक्ती रथयात्रा अभियान आयोजनाचा निश्चय करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता ढेरंगे यांनी केले. प्रास्ताविक भारत पवळे यांनी तर आभार नितीन सैंद यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता “वंदे मातरम !” गीताने झाली. कार्यक्रमाच्या संयोजनात संतोष घनवट, सचिन गायकवाड, माऊली राऊत, सागर लवटे, बाळासाहेब लोखंडे, सुधीर डावरे, विशाल आवटे, आकाश दौंडकर, राहुल मनोहर, गोविंद कांबळे, स्वप्निल दौंडकर यांचे बहुमोल सहकार्य लाभले.