Sunday, May 5, 2024
HomeNewsसोलापूर – गाणगापूर एसटी बसचा भीषण अपघात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत...

सोलापूर – गाणगापूर एसटी बसचा भीषण अपघात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत केली जाहीर

मुंबई, दि. २४ : सोलापूर – गाणगापूर एसटी बसला अक्कलकोट जवळ एका बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात जवळपास १५ ते २० प्रवासी जखमी असून सर्वांना अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. जखमींमध्ये ४ जण गंभीर आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. या अपघाताची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर – गाणगापूर बसचा अक्कलकोट-मैंदर्गी रस्त्यावर अपघात झाला आहे. सकाळी १०.३० च्या सुमारास बसला अपघात झाला आहे. पुलावरून जात असताना अचानक एसटी बस चालकाने नियंत्रण सुटले आणि बस पलटी झाली. अपघात झाल्याचे कळताच मुख्यमंत्र्यांनी सोलापूर जिल्हाधिकारी तसेच एसटी महामंडळ व पोलिसांकडून याची माहिती घेतली व जखमी तसेच इतरही प्रवाशांची व्यवस्था करावी अशा सूचना दिल्या.

अपघातात जखमी प्रवाशांना तातडीने अक्कलकोट किंवा जवळपासच्या रुग्णालयांत हलवून शासकीय खर्चाने योग्य त्या उपचारांची व्यवस्था करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. त्याचप्रमाणे अपघातात ज्यांना गंभीर दुखापत झाली आहे अशा ठराविक किंवा मोठा अस्थिभंग झालेल्या प्रवाशांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५० हजार रुपये अधिकची आर्थिक मदत करण्यात यावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

हेही वाचा

भारतीय पोस्टल विभाग, पुणे येथे रिक्त जागांसाठी भरती, 30 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत रिक्त पदासाठी भरती, 29 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

पश्चिम मध्य रेल्वे मध्ये अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती, 28 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

पॉवरग्रीड कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड मध्ये 1166 जागांसाठी भरती, आजच अर्ज करा

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.मध्ये विविध पदांची भरती, 26 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

राष्ट्रीय आरोग्य अभियान, अहमदनगर अंतर्गत 87 जागांसाठी भरती, 29 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

कॅन्टोन्मेंट बोर्ड, पुणे येथे रिक्त पदांसाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे निवड होणार!

Railway Recruitment : भारतीय रेल्वेमध्ये 1659 जागांसाठी भरती, 18000 ते 56000 रूपये पगारांची नोकरी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय