Thursday, April 25, 2024
Homeजुन्नरजुन्नर : ४ वर्षाच्या मुलीला पळविणारा आरोपी जेरबंद, जुन्नर पोलीस स्टेशनची कामगिरी

जुन्नर : ४ वर्षाच्या मुलीला पळविणारा आरोपी जेरबंद, जुन्नर पोलीस स्टेशनची कामगिरी

जुन्नर /आनंद कांबळे : जुन्नर पोलीस स्टेशन हद्दीत शनिवारी रात्री ११ वाजता पासुन जुन्नर शहरात पोसई दिलीप पवार, पोलिस हवालदार भरत मुठे, चालक पो.ना. संतोष पठारे असे रात्रगस्त करीत असताना, रविवारी दिनांक २४ रोजी १ वाजताच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे व जुन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विकास जाधव, यांनी रात्रगस्त अधिकारी दिलीप पवार यांना फोनद्वारे माहिती दिली की, पोलीस आयुक्तालय, पिपंरी चिंडवड, चिखली पोलीस स्टेशन गु.र. नं. ३८३ / २०२२, भा.द.वि कलम ३६३ मधील फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी वय ४ वर्षे, रा. संतकृपा हाऊसिंग सोसायटी, ताम्हाणेवस्ती, चिखली, पुणे हीस कोणीतरी अज्ञात आरोपीने फिर्यादी यांचे कायदेशिर रखवालीतुन फिर्यादी यांचे संमतीशिवाय पळवून नेले आहे.

सदर संशयीत आरोपीचे मोबाईल लोकेशन हे जुन्नर पोलीस स्टेशनचे हद्दित असल्याचे डी.सी.पी काकासाहेब डोळे, ए.सी.पी प्रशांत अमृतकर, तसेच ए.सी.पी. पद्माकर घनवट, पिंपरी चिचंवड आयुक्तालय यांनी आदेशित केल्याने तात्काळ पोलीस स्टाफला घेऊन जुन्नर शहरातील महादेवनगर, जुने एस.टी. स्टॅन्डजवळ संतोष मनोहर चौगुले यांच्या राहते घरासमोर जावुन घराची पाहणी केली असता, घरात एक महिला व एक पुरुष तसेच एक लहान मुलगी दिसली. त्यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी वॉट्सअॅपवर पाठविलेला पिडीत मुलीचा फोटो पाहुन संशय आल्याने सदर महिला व तीचे पती तसेच सदर अल्पवयीन मुलीस जुन्नर पोलीस स्टेशन येथे आणले. त्यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी जवळे, पोलीस निरीक्षक विकास जाधव यांचेसमक्ष सदर महिलेकडे अधिक विचारपुस केली असता, तीने उडवाउडवीचे उत्तरे दिले. त्यामुळे संशय बळावलेने तिच्या पतीकडे तपास केला असता, त्याने कबुली दिली की, सदरची मुलगी हि माझी पत्नी नामे विमल संतोष चौगुले, वय २८ वर्षे, हिने तिची चिखली, पुणे येथील बहिणीचे शेजारी राहणारी मुलगी पळवुन आणल्याचे सांगितले. अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांनी पिंपरी चिंचवड आयुक्तालय येथील डी.सी.पी काकासाहेब डोळे यांना सदरची माहिती दिली.

सदर पिडीत मुलगी व महिला आरोपी विमल संतोष चौगुले, वय २८ वर्षे, व तिचा पती संतोष मनोहर चौगुले, वय ४१ वर्षे दोन्ही रा. महादेवनगर जुन्नर, ता. जुन्नर, जि. पुणे यांना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय येथील पोनि इंगवले व दरोडा प्रतिबंधक पथक, पिंपरी चिंचवड आयुक्तालय यांच्या ताब्यात पुढील कायदेशिर कारवाईकामी देण्यात आलेले आहे.

सदरची ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर विभाग मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.विकास जाधव, जुन्नर पोलीस स्टेशन पोसई दिलीप पवार, पो. हवा. भरत मुठे, चालक पो ना संतोष पठारे यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास चिखली पोलीस स्टेशनचे सपोनि तौफिक सय्यद हे करीत आहेत.

हेही वाचा

सोलापूर – गाणगापूर एसटी बसचा भीषण अपघात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत केली जाहीर

भारतीय पोस्टल विभाग, पुणे येथे रिक्त जागांसाठी भरती, 30 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत रिक्त पदासाठी भरती, 29 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

पश्चिम मध्य रेल्वे मध्ये अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती, 28 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

पॉवरग्रीड कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड मध्ये 1166 जागांसाठी भरती, आजच अर्ज करा

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.मध्ये विविध पदांची भरती, 26 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

राष्ट्रीय आरोग्य अभियान, अहमदनगर अंतर्गत 87 जागांसाठी भरती, 29 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

कॅन्टोन्मेंट बोर्ड, पुणे येथे रिक्त पदांसाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे निवड होणार!

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय