Sunday, April 28, 2024
Homeजिल्हासिंधुदुर्ग : आशा व गटप्रवर्तकांची उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने

सिंधुदुर्ग : आशा व गटप्रवर्तकांची उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने

सिंधुदुर्ग, दि. २० : सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियन (सिटू संलग्न) च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेच्या सचिव कॉ. विजयाराणी पाटील यांनी दिली.

पाटील म्हणाल्या की, महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या आदेशानुसार 15 जून 2021 पासून संपूर्ण महाराष्ट्रात आशा व गटप्रवर्तक यांच्या न्याय मागण्यांसाठी बेमुदत संप आंदोलन सुरू आहे. या मागण्यांबाबत शासन योग्य तो निर्णय घेत नसल्याने राज्य कृती समितीच्या वतीने 21 जून 2021 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात मान. जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलने करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियन सिटू संलग्न यांच्या वतीने सोमवार दि. 21 जून 2021 रोजी दुपारी बारा वाजता मान जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदूर्ग येथे निदर्शने करण्यात येणार आहेत. 

■ आशा व गटप्रवर्तकांच्या मागण्या पुढीलप्रमाणे : 

● सार्वजनिक आरोग्य व्यवस्था मजबूत करा.

● आशा व गटप्रवर्तकाना आरोग्य कर्मचारी म्हणून केले पाहिजे.

● आशाना १८,००० रू. व गटप्रवर्तकाना २२,००० रू. वेतन मिळाले पाहिजे. 

● आशा व गटप्रवर्तकाना प्रतिदिन ३०० रू. कोविड भत्ता मिळाला पाहिजे. 

● आशा व गटप्रवर्तकाना माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचा सर्व टप्प्याचा मोबदला मिळाला पाहिजे. 

● कोरोना बाधित आशा व गटप्रवर्तक व त्यांच्या कुटुंबियांना व्हेंटिलेटरसह बेड राखीव ठेवण्यात यावेत.

● अँटीजेनचे टेस्टचे काम आशांवर लादू नये.

● आरोग्य कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास 50 लाखाचा विमा कवच आहे, त्यामध्ये आशा व गटप्रवर्तक यांचा स्पष्ट उल्लेख करावा.

● आरोग्यवर्धिनी समूह मध्ये गटप्रवर्तकना १५०० रू. दरमहा मोबदला द्यावा.

● प्रेरणा प्रकल्प रिपोर्टिंग साठी गटप्रवर्तकना १५०० रू सहामाही भत्ता व स्टेशनरी साठी ३००० रू. वार्षिक रक्कम द्यावी.

◆ आरोग्यसेविका भरतीमध्ये आशा व गटप्रवर्तक ना 50 टक्के आरक्षण मिळावे.  

● आशांना योजनाबाह्य व मोबदला नसलेले काम देऊ नये. 

● दरमहा मोबदल्याची हिशोब पावती आशा व गटप्रवर्तकांना द्यावी. 


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय