कोलकत्ता : कोलकत्ता येथील सोनारपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. भटक्या कुत्र्याच्या (stray dog) हत्येचा बदला घेण्यासाठी एका तरुणाने पती, पत्नी आणि त्यांच्या मुलावर जीवघेणा हल्ला केला आहे. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली असून, आरोपी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्यात तिघे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अर्चन भट्टाचार्य असे आरोपी तरुणाचे नाव आहे. धक्कादायक म्हणजे अर्चनने चेन्नईहून कोलकत्ता येथे प्रवास करून हा हल्ला केला आहे. सोनारपूरच्या चौहाटी परिसरात ही घटना घडली. अर्चनने गोविंद अधिकारी, त्यांच्या पत्नी आणि मुलावर चाकूने वार केले. या हल्ल्यात तिघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांना तात्काळ एमआर बांगूर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती पोलिसांना मिळताच ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अर्चनवर खूनाच्या प्रयत्नासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. अर्चन हा आयआयटीमधील पहिल्या वर्षाचा विद्यार्थी आहे. त्याच्या मित्राने दिलेल्या माहितीनुसार, अर्चनने भटक्या कुत्र्याच्या (stray dog) हत्येचा बदला घेण्यासाठी हा हल्ला केला.
Stray dog यांना खायला घालण्यावरून वाद
सोनारपूरच्या चौहाटी परिसरात अधिकारी आणि देबनाथ कुटुंबांमध्ये भटक्या कुत्र्यांना (stray dog) खायला घालण्यावरून वाद सुरू होता. अधिकारी कुटुंबाने अनेकदा कुत्रे घरात घुसतात म्हणून तक्रार केली होती. मागील काही महिन्यांपूर्वी, हा वाद अधिक वाढला आणि अधिकारी कुटुंबाने एका भटक्या कुत्र्याला बेदम मारहाण केली. या घटनेत तो कुत्रा जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला.
देबनाथ कुटुंबातील सदस्याने ही माहिती अर्चन याला दिली. त्यामुळे अर्चनने कुत्र्याच्या हत्येचा आणि देबनाथ कुटुंबाला त्रास दिल्याचा बदला घेण्याचे ठरवले. त्यानंतर अर्चनने गोविंद अधिकारी, त्यांच्या पत्नी आणि मुलावर चाकूने वार केले.
पोलिसांनी आरोपी अर्चनला ताब्यात घेतले असून, पुढील चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण पसरले आहे.
हेही वाचा :
दिवसा ढवळ्या बिबट्याचा वावर, दुचाकीस्वार थोडक्यात बचावला
मेंदू खाणाऱ्या अमिबाने 14 वर्षांच्या मुलाचा घेतला जीव
रिलसाठी स्टंट करताना दुचाकीवरून तरुणाचा भीषण अपघात, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल
जगातील पहिली CNG बाईक प्रदूषणमुक्त भारत ध्येय साध्य करेल – नितीन गडकरी
नाणेघाट : इतिहासाची आणि नैसर्गिक सौंदर्याची संगमभूमी
मोठी भरती : बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत भरती; पगार 64480 पर्यंत
ब्रेकिंग : मुख्याध्यापक नियुक्तीसाठी पटसंख्येचा निकष बदलणार ?
गावठी दारू तयार करणाऱ्या १० हातभट्ट्यांवर छापा; २ लाख १७ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त
AIASL मार्फत विविध पदांच्या 3256 जागांसाठी मेगा भरती
ब्रेकिंग : महाराष्ट्रातील झिका विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक नियमावली जाहीर