Shivajirao Adhalrao Patil : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता जोर धरू लागली आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघातील एक महत्वाची बातमी आहे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे आज राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेश करणार आहेत. त्यामुळे शिरुर लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा शिवाजीराव आढळराव पाटील विरूद्ध डॉ.अमोल कोल्हे थेट लढत होणार आहे. (Shivajirao Adhalrao Patil joined NCP today)
शिवसेनेच्या फुटीनंतर शिवाजीराव आढळराव पाटील हे एकनाथ शिंदे सोबत गेले होते. शिरुर लोकसभा लढवण्यास ते इच्छुक होते. मात्र शिरुर लोकसभेच्या जागेवर महायुतीमध्ये राष्ट्रवादीने (अजित पवार गट) दावा केल्याने शिवाजीराव आढळराव पाटील यांची अडचण झाली. त्यामुळे शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिवसेना (शिंदे गट) तून पुन्हा राष्ट्रवादीत (अजित पवार गट) प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
आज मंगळवारी शिरुर लोकसभा मतदारसंघातील मंचर येथे अजित पवार यांच्या उपस्थितीत आढळराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. या पक्ष प्रवेशादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व खेड विधानसभेचे आमदार दिलीप मोहिते पाटील, जुन्नर विधानसभेचे आमदार अतुल बेनके, भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे, हडपसर विधानसभेचे आमदार चेतन तुपे, भोसरी विधानसभेचे माजी आमदार विलास लांडे तसेच राष्ट्रवादी पक्षाचे इतर नेते उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रवादीच्या फूटीमुळे आता शिरूर लोकसभा मतदारसंघातून दोन्ही पवारांचे अस्तित्व पणाला लागणार आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे शिवाजीराव आढळराव पाटील विरुद्ध शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे अशी लढत होणार आहे.
हे ही वाचा :
हार्दिक पांड्याने असे काही केले की, पांड्यावर लोक भडकले
शाहरूख खानच्या ‘त्या’ कृतीमुळे लोकांचा संताप
JNU : ‘जेएनयू’ विद्यार्थी संघाच्या निवडणूकीत डाव्यांचा दणदणीत विजय तर भाजप संलग्न अभाविपचा सुपडा साफ
‘बदला’ घेणे एवढाच उद्देश; डॉ.अमोल कोल्हे यांची घणाघाती टीका
वयोवृद्ध आणि दिव्यांगांना ‘सक्षम’ अॅपच्या माध्यमातून मिळणार अधिकच्या सुविधा
…तर आम्ही महायुतीतून बाहेर पडू; अजित पवार गट आक्रमक