Saturday, April 27, 2024
Homeआंतरराष्ट्रीयब्रेकिंग : मुसळधार पाऊस, महापुरामुळे ब्राझीलमध्ये २३ मृत्यू, शेकडो घरे उद्ध्वस्त

ब्रेकिंग : मुसळधार पाऊस, महापुरामुळे ब्राझीलमध्ये २३ मृत्यू, शेकडो घरे उद्ध्वस्त

रिओ डी जनेरियो : आग्नेय ब्राझील मधील डोंगराळ भागात अचानक आलेल्या तुफानी पावसाने महापूर येऊन मोठ्या प्रमाणात भूस्खलन सुरू केले, चिखल, मातीच्या वेगवान पाण्यामुळे रिओ डी जनेरियो, एस्पिरिटो सँटो ( Espirito Santo), मिमोसो डो सुल (Mimoso do Sul) या शहरात महापूर आणि चिखलाने रस्ते, नागरी वसाहती उद्ध्वस्त झाल्या. BREAKING NEWS

नुकतेच आठवड्यापूर्वी ब्राझील मध्ये प्रचंड उष्णतेची लाट येऊन पारा ६० अंश गेल्यामुळे नागरिकांनी हैराण होऊन समुद्र किनारी गर्दी केली होती. सीएनएन (CNN) आणि डी डब्ल्यू (DW) वृत्तवाहिन्यांनी अवकाळी वादळी पावसाने नुकसान झालेल्या आग्नेय ब्राझील मधील शहराची माहिती प्रसारित केली आहे.

तापमानवाढ संकटामुळे (CLIMATE CHANGE ) अधिक तीव्र वादळी पाऊस दि.२३ मार्च रोजी सुरू झाला.राजधानी रिओ मध्ये रविवारी २०० मिमी पाऊस पडला,ब्राझीलच्या महत्वाच्या तीन शहरातील रस्ते,वसाहतीमध्ये चिखल युक्त महापुराचे पाणी शिरले,असे हवामान आंतरराष्ट्रीय हवामान विभागाने म्हटले आहे.

प्रशासनाने सैन्य, आपत्कालीन विभागाचे कर्मचारी यांना नागरिकांना सुरक्षित स्थळी पाठवून शेकडो नागरिकांची सुटका केली आहे. रुग्णवाहिका, बोटी, ड्रोन आणि विमानांचा मदतीसाठी वापर केला जात आहे.मुसळधार पावसामुळे हजारो लोक सुमारे ५ हजार लोक विस्थापित झाले आहेत. BRAZIL NEWS

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय