Thursday, September 19, 2024
Homeआंतरराष्ट्रीयमोठी बातमी : पंतप्रधान पदाच्या राजीनाम्यानंतर शेख हसीना भारतात दाखल

मोठी बातमी : पंतप्रधान पदाच्या राजीनाम्यानंतर शेख हसीना भारतात दाखल

Sheikh Hasina : बांगलादेशमध्ये आरक्षणविरोधी संघर्षांच्या तीव्रतेने पंतप्रधान शेख हसीना यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. देशभरातील हिंसाचारात मृतांची संख्या 300 वर गेली असून, रविवारी पोलीस आणि निदर्शक यांच्यात झालेल्या चकमकीत 94 लोकांचा बळी गेला. या घटनेनंतर शेख हसीना यांनी बांगलादेशातून पळ काढला असून त्या भारतात दाखल झाल्या आहेत.

गेल्या दोन महिन्यांपासून बांगलादेशात सुरू असलेल्या आरक्षण विरोधी विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 5 ऑगस्ट रोजी शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. वाढत्या हिंसाचारामुळे हसीना यांना देश सोडावा लागला. त्यांनी लष्करी विमानातून भारतात दाखल झाल्या. त्यांच्या सोबत बहिण रेहाना देखील आहेत.

Sheikh Hasina

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शेख हसीना आणि रेहाना पश्चिम बंगालच्या मार्गाने दिल्लीला दाखल झाल्या आहेत, आणि त्यानंतर त्या लंडन, फिनलँड किंवा दुसऱ्या देशात जाऊ शकतात.

दरम्यान, बांगलादेशचे लष्कर प्रमुख यांनी सांगितले की, आम्ही आता अंतरिम सरकार स्थापन करू आणि देशाची जबाबदारी सांभाळू. आंदोलनातील हत्यांसाठी जबाबदार असणाऱ्यांना न्याय मिळवून देऊ.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेविरोधातील याचिकेवर न्यायालयाचा मोठा निर्णय

मोठी बातमी : पंतप्रधान पदाच्या राजीनाम्यानंतर शेख हसीना भारतात दाखल

शेख हसीना देश सोडून पळाल्या, लष्करप्रमुख वाकेर-उझ-जमान यांची पत्रकार परिषद

सर्वात मोठी बातमी : पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा

खेळताना हौदात पडून 4 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू, थरकाप उडवणारी घटना कॅमेरात कैद

दिल्ली येथे होणार 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू ग्रॅहम थॉर्प यांचे निधन

मोठी भरती : भारतीय टपाल विभागात 44228 पदांची भरती; पात्रता 10वी पास

नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनलचे पश्चिम घाटाच्या इको-संवेदनशील क्षेत्राबाबत मंत्रालयाला निर्देश

सरन्यायाधीशांची नातवंडे सर्वोच्च न्यायालयात विराजमान झाल्यावर आम्हाला न्याय मिळेल; सामनातून टीका

मोठी बातमी : पुण्यात मुसळधार पाऊस सुरू, प्रशासनाच्या मदतीसाठी भारतीय लष्कर दाखल

ब्रेकिंग : खेळाडूंसाठी BCCI ने केली मोठी घोषणा

निशांत देवची निराशा, ऑलिम्पिकमध्ये पदकाची संधी हुकली

संबंधित लेख

लोकप्रिय