Saturday, December 7, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडमोठी बातमी : पुण्यात मुसळधार पाऊस सुरू, प्रशासनाच्या मदतीसाठी भारतीय लष्कर दाखल

मोठी बातमी : पुण्यात मुसळधार पाऊस सुरू, प्रशासनाच्या मदतीसाठी भारतीय लष्कर दाखल

पुणे : पुण्यातील निवासी भागात खडकवासला धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू झाल्यानंतर सैन्याच्या जवानांना तैनात करण्यात आले आहे. जोरदार पावसामुळे धरणातून पाणी सोडण्यात आले. पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाने काही रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवले. 35,000 क्यूसेक पाणी सोडल्यामुळे एकता नगर आणि द्वारका सोसायटीमध्ये पूर आला आहे. (Pune rain)

रविवारी खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात आल्याने शहराच्या निवासी भागात सैन्य तैनात करण्यात आले असल्याचे अधिकाऱ्यांनी पुष्टी केली आहे. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, एकता नगर भागातील काही रहिवाशांना सावधगिरीचा उपाय म्हणून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. पुणे जिल्हाधिकारी यांच्या विनंतीनुसार सैन्य तैनात करण्यात आले आहे.

सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मागील पंधरवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे धरणातून 35,000 क्यूसेक पाणी सोडण्यात आले. पुणे जिल्ह्यातील खडकवासला, पवना, मुळशी, चासकमान व इतर सर्वच धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत असून धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. हवामान खात्याने पुढील काही दिवस अशीच परिस्थिती असेल असा अंदाज व्यक्त केला आहे.

पुणे पोलिस सूचना :जवळपास सर्व धरणांमधून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु करण्यात येत आहे. गरज असेल तर पुढील काही दिवस घराबाहेर पडा. नदी पात्रात पुर रेषेच्या आत प्रवेश करू नका. स्वतःची परिवाराची, इतरांची काळजी घ्यावी. स्वतःहून संकटात पडू नका.

संरक्षण विभागाच्या एका प्रेस अपडेटमध्ये म्हटले आहे, “पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी खडकवासला धरणातून जास्त पाणी सोडल्यामुळे एकता नगरमध्ये भारतीय सैन्याची एक तुकडी तैनात करण्याची विनंती केली आहे. सैन्याची तुकडी सध्या त्या ठिकाणी पोहोचत आहे.” (Pune rain)

सैन्याचे जवान सिंहगड रोडवरील द्वारका सोसायटीत तैनात होते, जिथे पाण्याची पातळी खूप वाढली होती. विशेषतः, २५ जुलै रोजी, जोरदार पावसामुळे आणि धरणातून पाणी सोडल्यामुळे सिंहगड रोडवरील मुठा नदीच्या काठावर अनेक भाग पाण्याखाली गेले होते.

Pune rain

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

कोलकाता विमानतळ बनले तलाव; बंगाल मध्ये तुफान पाऊस, व्हिडिओ व्हायरल

बीएएमएस पदवीधारक विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय

दहावी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी; 3000+ जागांसाठी भरती

पुण्यातील निळ्या पूररेषेतील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा आराखडा तातडीने तयार करण्याचे निर्देश

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

ब्रेकिंग : जुन्नर येथील इंगळून घाटात दरड कोसळली, या गावांचा संपर्क तुटला

मोठी बातमी : संसदेतील ‘त्या’ भाषणानंतर राहुल गांधींवर ईडीची छापेमारी होणार ?

Jio, Airtel चे टेन्शन वाढले ; TATA आणि BSNL मध्ये मोठा करार

ब्रेकिंग : माझी लाडकी बहीण योजने संदर्भात नवीन माहिती समोर

संबंधित लेख

लोकप्रिय