Saturday, December 7, 2024
Homeताज्या बातम्याCJI Chandrachud : सरन्यायाधीशांची नातवंडे सर्वोच्च न्यायालयात विराजमान झाल्यावर आम्हाला न्याय मिळेल;...

CJI Chandrachud : सरन्यायाधीशांची नातवंडे सर्वोच्च न्यायालयात विराजमान झाल्यावर आम्हाला न्याय मिळेल; सामनातून टीका

CJI Dhananjay Chandrachud : शिवसेना ठाकरे गटाने आपल्या मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखातून सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यावर तीव्र उपहासात्मक टीका केली आहे. जानेवारी 2024 पर्यंत सर्वोच्च न्यायालयात 85 हजार खटले प्रलंबित असल्याचे उघड झाल्यानंतर, शिवसेनेने न्यायालयीन प्रक्रियेच्या कासवगतीवर सवाल उपस्थित केले आहेत.

शिवसेनेच्या अग्रलेखात म्हटले आहे की, शिवसेनेची फूट आणि पक्षांतराच्या सुनावणीला न्यायालयाने ठरवले तर चार दिवसांत निकाल लागेल, पण सरन्यायाधीशांच्या न्यायालयात गेल्या तीन वर्षांपासून फक्त तारखा पडत आहेत. यावर उपहास करताना, चंद्रचूड साहेबांच्या (CJI Dhananjay Chandrachud) नातवंडांनी सर्वोच्च न्यायालयात स्थान घेतल्यानंतर कदाचित या प्रकरणात न्याय मिळेल, असा टोला ठाकरे गटाने लगावला.

CJI Dhananjay Chandrachud

अग्रलेखात सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या न्यायव्यवस्थेवरील प्रवचनांवरही टीका करण्यात आली आहे. लेखात म्हटले आहे की, न्यायव्यवस्थेच्या भ्रष्टाचार, कासवगती, आणि राजकीय दबावावर यापूर्वीही अनेक सरन्यायाधीशांनी प्रवचने दिली आहेत, परंतु पोकळ प्रवचनांनी काहीही साध्य होत नाही. शिवसेना (ठाकरे गटाने) ‘तारीख पे तारीख’ या परिस्थितीवर नाराजी व्यक्त केली असून, न्यायव्यवस्थेची ही अवस्था चिंताजनक असल्याचे म्हटले आहे.

राज्यातील शिवसेना फूट, विधानसभा अध्यक्षांची कार्यवाही, आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांबाबत ठाकरे गटाने न्यायव्यवस्थेवरही सवाल उपस्थित केले आहेत. न्यायालयाच्या निष्पक्षतेबद्दलही शंका उपस्थित करताना, शिवसेनेने म्हटले आहे की, अशा प्रकरणांमध्ये दिल्लीतील सत्ताधाऱ्यांचा दबाव नाही ना, असे विचार करण्यास भाग पाडणारी परिस्थिती निर्माण झाली आहे.

या संपूर्ण प्रकरणावर कठोर टीका करत, ठाकरे गटाने न्यायव्यवस्थेची बूज राखण्याचे आवाहन केले आहे आणि ‘तारीख पे तारीख’च्या या गोंधळातून सुटका करण्याची मागणी केली आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : पुण्यात मुसळधार पाऊस सुरू, प्रशासनाच्या मदतीसाठी भारतीय लष्कर दाखल

ब्रेकिंग : खेळाडूंसाठी BCCI ने केली मोठी घोषणा

निशांत देवची निराशा, ऑलिम्पिकमध्ये पदकाची संधी हुकली

राज्यात मुसळधार पाऊसाचा इशारा, तर काही जिल्ह्यांना रेड अलर्ट

कोलकाता विमानतळ बनले तलाव; बंगाल मध्ये तुफान पाऊस, व्हिडिओ व्हायरल

बीएएमएस पदवीधारक विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय

संबंधित लेख

लोकप्रिय