क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त शंकर जगताप यांनी केले अभिवादन (Shankar Jagtap)
आदिवासी बांधवांच्या सशक्तीकरणासाठी आम्ही कटिबद्ध – शंकर जगताप
जनजातीय गौरव दिनानिमित्त आदिवासी बांधवांना जगताप यांनी दिल्या शुभेच्छा
पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : दि. 15 – महान आदिवासी स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक आणि जननायक भगवान बिरसा मुंडा यांनी आपल्या प्रभावी नेतृत्वाने ब्रिटिशांच्या विरोधात आदिवासी समाजाचे शोषण थांबवण्यासाठी लढा दिला. क्रांतीच्या माध्यमातून त्यांनी आदिवासींच्या हक्कांसाठी मोठा लढा उभारला. त्यांच्या संघर्षाने देशातील स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा दिली. आजच्या दिवशी आपण त्यांचे शौर्य, त्याग आणि कार्याची प्रेरणा घेणे आवश्यक आहे, अशा शब्दांत शंकर जगताप यांनी क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांना अभिवादन केले. (Shankar Jagtap)
आदिवासी जननायक, स्वातंत्र्य सेनानी व क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त पिंपळे गुरव येथे चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – आरपीआय (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांनी अभिवादन केले. त्यांनी आदिवासी बांधवांना जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी माजी नगरसेविका उषा मुंढे, माजी नगरसेविका आशा सुपे, ललिता सातपुते, लक्ष्मीबाई बोकड, संगीता दगडे, संगीता नांगरे, संगीता रावते, आशा असवले, गौरी गोणटे, शिला भालचीम, शांता भूरकुंडे, अंजना साबळे, डॉ. सुपे, सुदाम मराडे, कृष्णा भालचीम, जावजी शेळके, बाळू शेळके, सिताराम वालकोळी, बाळू उगले, सुनील बांबळे, अक्षय भोरले, किरण शेळके, राहुल असवले, प्रतिक उगले, नागेश भालचीम, प्रकाश कांबळे, ऍड. पांडुरंग कोरके यांच्यासह सह्याद्री आदिवासी महिला विकास प्रतिष्ठान आणि आदिवासी तरुण मंडळाचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Shankar Jagtap)
जननायक बिरसा मुंडा यांना अभिवादन!
जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना प्रथम अभिवादन करतो. त्याचे अदम्य साहस हे आमचे प्रेरणा स्रोत आहे. आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांच्या जीवनापासून प्रेरणा घेऊन, आम्ही आमच्या आदिवासी समुदायांच्या सशक्तीकरणासाठी कार्यरत आहोत.
– शंकर जगताप, चिंचवड विधानसभा मतदार संघ, महायुतीचे उमेदवार
हेही वाचा :
दिशा सालियन प्रकरण पुन्हा तपासणार, रामदास कदम यांचा आदित्य ठाकरेंना इशारा
या कारणामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना सलग चार दिवस सुट्टी
मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध, ‘आम्ही हे करू’च्या घोषणांवर राज ठाकरेंचा भर
चंद्रकांत पाटलांच्या प्रयत्नांना यश ; बाणेर-बालेवाडी पाणी प्रश्न मार्गी
भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
भरधाव क्रुझर पुलाच्या कठड्याला धडकली, चालकाचा मृत्यू ; ७ जखमी
माजी मंत्री नितीन राऊत यांच्या कारला भीषण अपघात
अजितदादांसाठी अभिनेत्री प्रचाराच्या मैदानात ; व्हिडिओ शेअर करत मतदानाचं आवाहन
सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना थेट इशारा, म्हणाल्या…
नारायण राणेंच्या पत्नीने मुलांच्या व नवऱ्याच्या स्वभावाबद्दल व्यक्त केली खंत
मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य