Sunday, December 8, 2024
Homeताज्या बातम्यामहत्त्वाची बातमी : या कारणामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना सलग चार दिवस सुट्टी

महत्त्वाची बातमी : या कारणामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना सलग चार दिवस सुट्टी

Maharashtra Election : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाळकरी विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी राज्यातील शाळांमध्ये मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे राज्यातील शाळांना 18, 19, आणि 20 नोव्हेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच, 17 नोव्हेंबरला रविवार असल्यामुळे विद्यार्थ्यांना सलग चार दिवस सुट्टी मिळणार आहे.

शिक्षण विभागाने दिलेल्या निर्देशांनुसार, निवडणुकीच्या तयारीसाठी अनेक शाळा प्रशासनाच्या ताब्यात दिल्या जातील, तसेच शिक्षकांना निवडणूक कर्तव्यावर पाठवले जाणार आहे. त्यामुळे संबंधित शाळांमध्ये शैक्षणिक कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शिक्षण आयुक्तांनी संबंधित मुख्याध्यापकांना शाळा बंद ठेवण्याबाबत सूचना दिल्या आहेत. “शाळांमध्ये मतदान केंद्र तयार करण्यासाठी आणि शिक्षकांच्या निवडणूक कर्तव्यासाठी शाळा बंद ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे ही निर्णय प्रक्रिया स्थानिक पातळीवर मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली पार पडावी,” असे आयुक्तांनी सांगितले आहे.

या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना सलग चार दिवसांच्या सुट्ट्यांचा आनंद लुटता येईल, तर दुसरीकडे मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक तयारी सुरळीतपणे पार पाडली जाईल. विधानसभा निवडणुकीसाठी मतदान 20 नोव्हेंबर रोजी होणार असून राज्यभरातील शाळांमध्ये मतदान केंद्र उभारली जातील.

विधानसभा निवडणुकीमुळे विद्यार्थ्यांना मिळालेल्या या सुट्ट्यांमुळे त्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे.

Maharashtra Election

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध, ‘आम्ही हे करू’च्या घोषणांवर राज ठाकरेंचा भर

चंद्रकांत पाटलांच्या प्रयत्नांना यश ; बाणेर-बालेवाडी पाणी प्रश्न मार्गी

भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन

भरधाव क्रुझर पुलाच्या कठड्याला धडकली, चालकाचा मृत्यू ; ७ जखमी

माजी मंत्री नितीन राऊत यांच्या कारला भीषण अपघात

अजितदादांसाठी अभिनेत्री प्रचाराच्या मैदानात ; व्हिडिओ शेअर करत मतदानाचं आवाहन

सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना थेट इशारा, म्हणाल्या…

नारायण राणेंच्या पत्नीने मुलांच्या व नवऱ्याच्या स्वभावाबद्दल व्यक्त केली खंत

मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य

संबंधित लेख

लोकप्रिय