Sunday, December 8, 2024
Homeताज्या बातम्यामनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध, ‘आम्ही हे करू’च्या घोषणांवर राज ठाकरेंचा भर

मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध, ‘आम्ही हे करू’च्या घोषणांवर राज ठाकरेंचा भर

Raj Thackeray :  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) जाहीरनामा ‘आम्ही हे करू’ या नावाने प्रसिद्ध केला आहे.याच पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) जाहीरनामा आज, 15 नोव्हेंबर रोजी पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध करण्यात आला. ‘आम्ही हे करू’ या शीर्षकाखाली मनसेने हा जाहीरनामा सादर केला असून, यात राज्यातील महिलांपासून ते तरुणांपर्यंत आणि शिक्षणापासून ते आरोग्यापर्यंत अनेक महत्त्वाच्या घोषणांचा समावेश आहे.

“मनसेला 19 वर्षे झाली आहेत. या कालावधीत पक्षाने केलेल्या कामांची माहिती यामध्ये दिली आहे. अनेक प्रश्न आजही तसेच आहेत, त्यामुळे त्यावरच पुन्हा भर देत ‘ब्ल्यू प्रिंट’च्या आधारावर जाहीरनाम्यातील मुद्दे समोर ठेवले आहेत,” असे राज ठाकरे यांनी जाहीरनाम्याच्या प्रकाशनावेळी सांगितले..आमच्या जाहीरनाम्यामध्ये ब्ल्यू प्रिंटच्या अनेक गोष्टी आणलेल्या आहेत याचं कारण, विषय बदलले नाहीत. प्रश्न बदललेले नाहीत, अद्यापही तेच प्रश्न आहेत. अजूनही आपण त्याच प्रश्नांवर चर्चा करत आहोत म्हणून मला असं वाटतं की आज हा जाहीरनामा तुमच्यासमोर ठेवत आहे, असं राज ठाकरे म्हणाले

मनसेच्या जाहीरनाम्याचे प्रमुख मुद्दे :

  1. मूलभूत गरजा आणि दर्जेदार जीवनमान :
    नागरिकांना दर्जेदार पाणीपुरवठा, दळणवळणाची सुविधा, आणि विश्वासार्ह वीज उपलब्ध करून देण्याचे आश्वासन.
  2. महिला आणि तरुणांसाठी विशेष धोरणे :
  • महिलांच्या सुरक्षेसाठी आधुनिक उपाययोजना.
  • तरुणांसाठी रोजगारसंधी आणि व्यावसायिक शिक्षणावर भर.
  1. राज्याची औद्योगिक प्रगती :
    औद्योगिक विकासासाठी सुसज्ज धोरण, मराठी उद्योजकांना प्रोत्साहन, आणि परराज्यातून भांडवल आकर्षित करण्याचे नियोजन.
  2. मराठी भाषेचा प्रचार आणि गडकिल्ल्यांचे संवर्धन :
  • मराठी भाषा जपण्यासाठी विविध उपक्रम राबवणार.
  • ऐतिहासिक गडकिल्ल्यांचे संवर्धन करून पर्यटनाला चालना.
  1. घनकचरा व्यवस्थापन आणि डिजिटल प्रशासन :
  • शहरांमध्ये घनकचरा व्यवस्थापनाची आधुनिक प्रणाली लागू करणार.
  • डिजिटल प्रशासनाला प्रोत्साहन देऊन नागरी सुविधा सुलभ करण्याचे उद्दिष्ट.

मनसेने आपल्या जाहीरनाम्यात लोकसहभागाला विशेष महत्त्व दिले आहे. सक्षम स्थानिक प्रशासनासाठी लोकांच्या सहभागावर भर दिला आहे.

गडकिल्ल्यांचे संवर्धन आणि पर्यटन विकासावर भर:
मनसेने राज्यातील ऐतिहासिक गडकिल्ल्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी विशेष योजना राबवण्याचे जाहीर केले आहे. याशिवाय, दळणवळण, वीज, पाण्याचे नियोजन,कृषी आणि पर्यटन विकासासाठीही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मनसेच्या या जाहीरनाम्यामुळे राज्याच्या राजकीय वातावरणात नवा रंग भरला असून, आगामी निवडणुकीत मनसेची भूमिका अधिक ठळक होईल, असा विश्वास पक्षाने व्यक्त केला आहे.

Raj Thackeray

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

चंद्रकांत पाटलांच्या प्रयत्नांना यश ; बाणेर-बालेवाडी पाणी प्रश्न मार्गी

लग्नसराईत सोनं झालं स्वस्त ; खरेदीसाठी ग्राहकांची लगबग वाढली

भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन

भरधाव क्रुझर पुलाच्या कठड्याला धडकली, चालकाचा मृत्यू ; ७ जखमी

माजी मंत्री नितीन राऊत यांच्या कारला भीषण अपघात

अजितदादांसाठी अभिनेत्री प्रचाराच्या मैदानात ; व्हिडिओ शेअर करत मतदानाचं आवाहन

सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना थेट इशारा, म्हणाल्या…

नारायण राणेंच्या पत्नीने मुलांच्या व नवऱ्याच्या स्वभावाबद्दल व्यक्त केली खंत

मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य

संबंधित लेख

लोकप्रिय